Jupiter Vakri In Aries : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका विशिष्ठ वेळेला भ्रमण करतात. ग्रह वेळोवेळी भ्रमण करून शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. दरम्यान या योगांचा मानवी जीवनावर परिणाम दिसून येतो. यावेळी काही राशींना याचा सकारात्मक परिणाम मिळतो तर काहींना नकारात्मक परिणामांना सामोरं जावं लागतं. अशातच विपरीत राजयोगाचा काही जातकांना फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी सप्टेंबर महिन्यात बृहस्पति वक्री चाल चालणार आहे. गुरुच्या या वक्री ( Guru Vakri ) चालीमुळे विपरीत राजयोग तयार होईल. दरम्यान राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. मात्र अशा 3 राशी आहेत ज्यांना या राजयोगाच्या प्रभावामुळे संपत्ती आणि करिअरमध्ये प्रगती होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे. 


मीन रास ( Pisces Zodiac )


विपरिज राजयोग तयार झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरु होणार आहेत. यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला आर्थिक प्रगती देखील देऊ शकतात. या गुरूच्या वक्रीमुळे व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळवू शकता. 


सिंह रास ( Leo Zodiac )


विपरीत राजयोग तयार झाल्यामुळे या राशींसोबत नशीब असणार आहे शकते. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात रस घेऊ शकता. घरात कोणताही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होणार आहे. शकतो. यावेळी विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतात. नोकरदार लोकांना चांगल्या संधी मिळतील. कोणत्याही कामात मेहनत कमी पडू देऊ नये. मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. 


मिथुन रास ( Gemini Zodiac )


मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्पन्न आणि लाभाच्या दृष्टीकोनातून विपरीत राजयोग तयार होणार आहे. कारण यावेळी तुमचं उत्पन्न वाढू शकतं. आर्थिक दृष्टिकोनातूनही काळ खूप अनुकूल राहणार आहे. या काळात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल. व्यवसायाचा सौदा करता येईल, जो भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. नोकरदार लोकांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )