Rajlakshan Rajyoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव प्रत्येक महिन्यात आपली स्थिती बदलतो. सूर्यदेवाचा या राशी बदलाला सूर्य संक्रमण किंवा सूर्य संक्रात असं म्हटलं जातं. सूर्याच्या या स्थिती बदलामुळे 12 राशींच्या लोकांवर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतो. सूर्यदेव हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत असल्याने त्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीवर होतो. येत्या 16 डिसेंबरला सूर्यदेव धनु राशीत गोचर करणार आहे. धनु ही गुरुची रास मानली जाते. त्यामुळे गुरुच्या राशीत सूर्याचा प्रवेश लाभदायक ठरणार आहे. त्यात गुरु मेष राशीत विराजममान आहे. त्यात सूर्यावर नववे स्थान असून त्यातून नवपंचम राजयोग निर्माण झाला आहे. या दुर्मिळ योगामुळे राजलक्षण राजयोगही तयार होत आहे. हा योग काही राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जातो आहे. (After 12 years the powerful Rajlakshan Rajyoga was created In 2024 Suryadev will give wealth to these people) 


'या' राशींचे गोल्डन डेज 


मेष राशी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या कुंडलीतील चढत्या घरात गुरु आहे. त्यामुळे राज लक्षण राजयोग या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. नवीन वर्षात उत्तम नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुम्हाला हवं असलेले इच्छित यश प्राप्त होणार आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशवारीचे योग आहेत. कुटुंबासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. कायदेशीर बाबींतून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. नवीन वर्षात वाहन, मालमत्ता खरेदीचे योग आहेत. उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहे. 


सिंह राशी


या राशीच्या लोकांसाठी राज लक्षण राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या राशीच्या पाचव्या घरात राज लक्षण राजयोग तयार होतो आहे. यामुळे उच्च शिक्षणाची संधी तुम्हाला मिळणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. मुलांकडून कानावर आनंदाची बातमी पडणार आहे. कुटुंबासोबत आनंदायी वेळ घालविणार आहात. दीर्घकाळ त्रस्त असलेल्या आजारातून दिलासा मिळणार आहे. यासोबतच नवपंचम योग तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Gajlaxmi Rajyog 2024 : गुरु - शुक्र संयोगामुळे तयार होणार गजलक्ष्मी राजयोग, 2024 मध्ये 'या' लोकांना प्रमोशनसह पगारवाढ?


धनु राशी


सूर्य या राशीच्या चढत्या घरात विराजमान आहे. तर वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा चढत्या घराचा स्वामी आहे. अशा स्थितीत राज लक्षण राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास झपाट्याने वाढणार आहे. प्रदीर्घ प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंद असणार आहे. तुमच्या अनेक इच्छा या राजयोगामुळे पूर्ण होणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे. प्रमोशनसोबत पगारातही वाढ होणार आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)