Samsaptak Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी 16 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे शनी स्वतःच्या कुंभ राशीत असेल आणि सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत असणार आहे. यावेळी एकमेकांपासून 180 अंशांवर असेल. दोन्ही ग्रह एकमेकांपासून सातव्या घरात असतील. एकमेकांकडे पाहिल्यामुळे समसप्तक योग तयार होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष्य शास्त्रानुसार, सुमारे 30 वर्षांनी सूर्य आणि शनिमध्ये असा योग तयार झाला आहे. दरम्यान काही राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे. तर काही राशींच्या व्यक्तींसाठी हा योग धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग धोकादायक ठरू शकतो.


मेष रास


हा समसप्तक योग मेष राशीच्या लोकांना नकारात्मक परिणाम देऊ शकतो. या महिन्यात कोणताही धोका पत्करण्याची चूक करू नका. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे. समसप्तक योगच्या काळात तुम्ही कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक लाभ करण्याचा विचार करत असाल तर नीट विचार करूनच निर्णय घ्या. तब्येतही बिघडू शकते.


कन्‍या रास


या महिन्यात तुमचा खर्च तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो. अनावश्यक ताण तुम्हाला निद्रानाश देऊ शकतो. करिअर आणि व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. कोणत्याही वादात अडकल्याने तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या बाजूने नशीब मिळण्यात अडचण येईल.


मकर रास


ऑगस्ट महिन्यात तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या आघाडीवर नुकसान होऊ शकते. नोकरदार लोकांना त्यांच्या कामात खूप सावध राहावं लागणार आहे. गुप्त शत्रू वर्चस्व गाजवू शकतात. हृदयरोग्यांनी या काळात विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अनेक प्रकारच्या समस्या तुमच्या वाट्याला येऊ शकतात


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)