Hindu Nav Varsh 2024: ज्योतिषशास्त्रानुसार 09 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होतेय. त्याचबरोबर हिंदू नववर्ष संवत 2081 देखील सुरू होणार आहे. त्याचबरोबर नवीन वर्षात 3 राजयोग तयार होणार आहेत. हे राजयोग शश आणि अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू नववर्षाचा राजा मंगळ आहे. अशा स्थितीत वर्षभर शनी आणि मंगळाचा प्रभाव दिसून येणार आहे. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकणार आहे. तसंच काही राशींच्या समस्यांचं निराकरण होणार आहे. जाणून घेऊया नवीन वर्षात कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. 


वृषभ रास (Taurus Zodiac)


हिंदू नववर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या वर्षात अनेक नवीन व्यवसाय देखील सुरू केले जाऊ शकतात. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते. वर्षभर तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता आणि घरी काही धार्मिक कार्यक्रम आयोजित करू शकता. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळतील.


मिथुन रास (Mithun Zodiac)


हिंदू नववर्ष तुमच्यासाठी अनुकूल असू शकते. या वर्षी तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये यश मिळेल.  तुम्हाला जुन्या कर्जातुन सुटका मिळेल आणि गुंतवणुकीसाठी वेळ अनुकूल राहील. व्यावसायिकांना आर्थिक फायदा होईल. आर्थिक परिस्थिती मजबूत असणार आहे. वैयक्तिक आयुष्य देखील चांगलं राहणार आहे. तुमच्या करिअरमध्ये निर्माण झालेल्या समस्या आता संपू शकतात. 


धनु रास (Dhanu Zodiac)


धनु राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळतील. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या वर्षी अपेक्षित नफा मिळू शकेल. तुमच्या बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. या वर्षी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. यशाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )