Gajlakshmi, Gajkesari, kedra Trikon Rajyog: ज्योतिषशास्त्रात, प्रत्येक ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये नऊ ग्रहांपैकी गुरूचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानलं जातं. गुरु ग्रहाला एका राशीतून दुसर्‍या राशीत जाण्यासाठी तब्बल 13 महिने लागतात. सध्या बृहस्पति मेष राशीत वक्री स्थितीत आहे. तर 31 डिसेंबर रोजी मार्गस्थ होणार आहे, अशा स्थितीत 50 वर्षांनंतर गजलक्ष्मी राजयोग, गजकेसरी राजयोग आणि केंद्र त्रिकोण तयार होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिष शास्त्रानुसार, डिसेंबरच्या अखेरीस चंद्र देखील मेष राशीत गोचर करणार आहे. यामुळे पुन्हा एकदा मेष राशीमध्ये चंद्र आणि गुरूचा संयोगाने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. यासोबतच गुरु ग्रहाच्या मार्गस्थ चालीने गजलक्ष्मी आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार होणार आहे. या 3 राजयोगांमुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहे.


मेष रास


डिसेंबरच्या अखेरीस, गुरूच्या स्थिती बदलामुळे केंद्र त्रिकोणासह गजकेसरी राजयोगाची निर्मिती खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे. या 3 राजयोगांमुळे नोकरदारांना चांगली बातमी मिळू शकते, उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होणार आहेत. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात आर्थिक लाभ होईल आणि करिअरमध्ये यश मिळेल. 


धनु रास


धनु राशीच्या व्यक्तींना या 3 राजयोगाचा लाभ मिळणार आहे. मुलांच्या लग्नासंबंधी काही चांगली बातमी मिळू शकते. कामात यश मिळणार असून अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची भेट मिळू शकते. मालमत्तेचे किंवा वाहनाचे सुख मिळू शकतं. वडिलोपार्जित मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.


कर्क रास


या लोकांना 3 राजयोगांमुळे लाभ मिळू शकतो. तुम्हाला उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळू शकते. अचानक आर्थिक लाभ आणि प्रगती होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांसाठी, संबंधांमुळे विवाह होऊ शकतो. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. 


सिंह रास


गजलक्ष्मी, गजकेसरी आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची एकत्रित निर्मिती या राशींच्या व्यक्तींसाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे. गजकेसरी राजयोगामुळे नशीब तुमच्या बाजूने असू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी काळ फलदायी ठरेल. पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. प्रवास आणि संपत्तीतून लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये जोरदार संकेत आहेत.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )