Budhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! `या` राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत.
Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनुसार आपली स्थिती बदलत असतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे जाचकाच्या कुंडलीत शुभ आणि अशुभ योग निर्माण होत असतात. दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य हा अतिशय शुभ असा राजयोग निर्माण होणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरला सूर्य गोचरमुळे वृश्चिक राशीमध्ये बुध सुर्याचं मिलन होणार आहे. त्यामुळे हा बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. (After Diwali Budhaditya Rajayoga will be created in Scorpio Rain of money will fall on these zodiac signs)
तूळ रास (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या राशीच्या धन घरात हा योग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे तुम्हाला अचानक वेळोवेळी धनलाभ होणार आहे. अगदी तुमचे अडकलेले पैसेही तुमच्याकडे परत येणार आहे. नोकरदारांना उत्पन्नात प्रचंड वाढ होमार आहे. कामात प्रगती होणार आहे. करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात. कुटुंबात आनंद आणि सुख असणार आहे. त्याशिवाय व्यावसायिकांना जबरदस्त फायदा होणार आहे. मार्केटिंग, मीडिया, शिक्षण आणि संप्रेषण क्षेत्रातील लोकांना फायदा होणार आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
सिंह राशीच्या लोकांसाठी बुधादित्या राजयोग वरदान ठरणार आहे. तुमच्या राशीच्या चौथ्या घरात या राजयोग निर्माण होणार आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदीचे तगडा योग आहे. तुमच्या आनंदी, समृद्धी सोबत लक्झरी सुखात वाढ होणार आहे. तुमच्या कामात प्रगतीसोबत यश मिळणार आहे. चांगला आर्थिक नफा नशिबाची साथ मिळणार आहे. नोकरी आणि व्यवसायात तुमची प्रगती आणि यश सुखी जीवनाची सुरुवात होणार आहे.
मकर रास (Capricorn Zodiac)
बुधादित्य राजयोग लोकांसाठी शुभ ठरणार आहे. आर्थिक लाभासोबत प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. कारण हा योग तुमच्या कुंडलीतील उत्पन्न आणि लाभाच्या स्थानावर असणार आहे. या राजयोगामुळे तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. नोकरदार लोकांना फायदा होणार आहे. तर मुलाशी संबंधित आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडणार आहे. त्याशिवाय शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये तुमचा नफा मिळणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)