Chandra Grahan 2024 : गणेशोत्सवानंतर `या` राशींना लागणार ग्रहण, दुसरं चंद्रग्रहण खूप त्रासदायक
Chandra Grahan 2024 : या वर्षांतील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवानंतर लगेचच लागणार आहे. पितृ पक्षाच्या पहिलाच दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. हे चंद्रग्रहण काही राशींच्या आयुष्याला ग्रहण लावणार आहे.
Chandra Grahan September 2024: हिंदू धर्मात ग्रहण हे अशुभ मानले जाते. तर वैज्ञानिकदृष्ट्या ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. पण ज्योतिषशास्त्रात ग्रहण काळात शुभ कार्य करायचं नसतं. शिवाय ग्रहणाचा परिणाम पृथ्वीतलावर आणि मानवाच्या आयुष्यावर होतो. या वर्षातील दुसरं चंद्रग्रहण हे गणेशोत्सवनंतर म्हणजे गणेश चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पितृ पक्षाच्या पहिला दिवशी असणार आहे. त्यामुळे पितृपक्षावर ग्रहणाची सावली असणार आहे. या वर्षातील पहिलं ग्रहण हे होळीच्या दिवशी 25 मार्च 2024 लागले होते. दुसरं चंद्रग्रहण हे 4 तास 45 मिनिटं असणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्रग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी सावध राहावे लागणार आहे. जाणून घेऊया या वर्षातील दुसऱ्या चंद्रग्रहणाची वेळ, सुतक काळ आणि कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
18 सप्टेंबर 2024 रोजी चंद्रग्रहण सकाळी 6.12 वाजता सुरू होईल आणि 10.17 वाजेपर्यंत असणार आहे. चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही, त्यामुळे भारतात सुतक काळ पाळला जाणार नाही.
हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2024 : पितृपक्षावर चंद्र आणि सूर्यग्रहणाची सावली, पितरं श्राद्ध स्वीकार करतील का? ज्योतिषाकडून जाणून घ्या ग्रहण शुभ की अशुभ
मेष (Aries Zodiac)
या राशीच्या लोकांना त्यांच्या जवळच्या व्यक्तीसोबतच्या नात्यात तणाव येण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. करिअरबदद्ल सावध राहा.
कर्क (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये बदल होणार आहे. तुम्ही तुमची सध्याची नोकरी सोडण्याचा निर्णय घेऊ शकता. या बदलांचा त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या.
तूळ (Libra Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण खूप धोकादायक ठरू शकते. या काळात तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणीही विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे तिथे काळजी घेण्याची गरज आहे.
मकर (Capricorn Zodiac)
चंद्रग्रहण मकर राशीच्या लोकांच्या जीवनात संकट आणू शकते. मकर राशीच्या लोकांना आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. कुटुंबातील ज्येष्ठांशी मतभेद होऊ शकतात, हे तुमच्यासाठी चांगले नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)