मुंबई : पूजेच्या वेळी जसं दिव्याला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व अगरबत्तीला आहे. सकाळच्या पूजेपासून ते तिन्हीसांजेलाही अगदी देवापुढे अगरबत्ती लावली जाते. अक्षत, चंदन, कुंकू, फूल धूप आणि अगबत्तीचा पूजेसाठी वापर केला जातो. आपण अगरबत्ती लावून अगदी सहज ती देवापुढे ओवाळून लावतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगरबत्ती लावण्याची योग्य पद्धत जर आपल्याला माहिती नसेल तर त्याचा त्रास होतो. त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकतो. अगरबत्ती पेटवल्याने पितृदोष होतो आणि अनेक त्यामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. 


वास्तुशास्त्रात बांबूला खूप शुभ मानलं जातं. हे रोप घर आणि ऑफिसमध्ये ठेवल्याने सकारात्मकता निर्माण होते आणि प्रगती होते. अनेक प्रकारचे वास्तू दोष दूर करण्यासाठी बांबूचे रोप ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 


अशा शुभ वस्तू जाळणे म्हणजे घरातील सकारात्मकता घालवण्यासारखं आहे. भारतीय परंपरेतही बांबू जाळणं शुभं मानलं जात नाही. याची अनेक कारणे आहेत. अगरबत्ती बनवण्यासाठी बांबूचे लाकूड वापरले जात असल्याने अगरबत्ती लावणं अशुभं मानलं जातं. 


- बांबू वंशाचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे त्याला जाळणं म्हणजे तुमच्या वंशपरंपरेला नुकसान करण्यासारखं आहे. हिंदू धर्मात अंत्यसंस्कारावेळी बांबूचा वापर केला जातो. मात्र चितेवर बांबू नाही तर इतर लाकडं ठेवलेली असतात. बांबू जाळण्यासाठी तिथेही वापरत नाहीत. 
-बांबू कधीच जाळू नये त्यामुळे पितृदोष होतो असेही मानले जाते. बांबू जाळल्याने पर्यावरणाला हानी होते असं मानलं जातं. अशा परिस्थितीमध्ये जर बांबूच्या काडीवर रसायनं लावून जाळलेली अगरबत्ती ही देखील धोकादायक ठरू शकते. 
- बांबूचं लाकूड शास्त्रानुसार जाळ्यास मनाई आहे. फेंगशुईनुसार, बांबू जाळल्याने व्यक्तीचे नशीब फिरतं आणि वाईट होतं. कारण बांबूचे रोप सकारात्मक आणि प्रगती करणारं मानलं जातं. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )