Akshaya Tritiya 2023: वैवाहिक सुख पाहिजे की पैसा? अक्षय्य तृतीयाला करा `हे` उपाय!
Akshaya Tritiya 2023 Date: यंदाच्या वर्षी, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023) शनिवार म्हणजेच 22 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाला खालील उपाय (Akshaya Tritiya Upay) करणं गरजेचं आहे.
Akshaya Tritiya 2023 Upay: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya) विशेष महत्त्व आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. या वेळी अक्षय्य तृतीया देखील खास असणार आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (Akshaya Tritiya 2023) दानधर्म केल्यानं घरातील संकटं आणि शत्रूंचा विनाश होतो, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे अक्षय तृतीयाला खालील उपाय (Akshaya Tritiya Upay) करणं गरजेचं आहे.
कधी आहे Akshaya Tritiya ? (Akshaya Tritiya 2023 Date)
हिंदू कॅलेंडरनुसार, यंदाच्या वर्षी, अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023 Date) शनिवार म्हणजेच 22 एप्रिल 2023 पासून सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी, रविवारी, 23 एप्रिल 2023 रोजी संपत आहे.
कोणते उपाय कराल? (Akshaya Tritiya 2023 Upay)
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने धनप्राप्तीचे उपाय केल्याने व्यक्ती लवकर धनवान बनते, अशी देखील मान्यता आहे. दिवाळीप्रमाणेच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केल्यानं सुख आणि समृद्धी प्राप्त असं म्हणतात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करून गुलाबाचं फूल अर्पण करावं. तसेच लक्ष्मीला नवीन स्फटिक माला अर्पण करावी. जुनी जपमाळ गंगाजळमध्ये धुवून लक्ष्मीसमोर ठेवू शकता.
दरम्यान, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माँ लक्ष्मीचे पाय खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं. तसेच क्षमतेनुसार सोनं- चांदीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. त्याचबरोबर केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा करा. स्वच्छ लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी 11 रुपये देवीला अर्पण केला जातो.