Amalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
Amalaki Ekadashi 2024 : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी किंवा अमलकी एकादशी असं म्हटलं जातं. वर्षाला 24 एकादशी असून हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. मग अमलाकी एकादशीला आवळाला महत्त्व का असतं?
Amalaki Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात सण आणि व्रतांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी, विनायक चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, अमावस्या, पौर्णिमा आणि प्रदोष व्रत येत असतं. महिन्यातील प्रत्येक तिथीला हिंदू धर्मात आपलं असं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही महिन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाला येतं असते. फाल्गुन महिन्यातील एकादशी ही रंगभरी आणि अमलकी एकादशी म्हटलं जातं. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. यावर्षातील अमलकी एकादशी कधी आहे. या पूजेमध्ये आवळ्याला का महत्त्व आहे. (Amalaki Ekadashi 2024 Why is Amalaki or Rangbhari Ekadashi date so important Know Tithi auspicious time shubh muhurat and puja vidhi)
अमलकी एकादशी कधी असते? (Amalaki Ekadashi 2024 Shubh Muhurat)
अमलकी एकादशीला आमला एकादशी आणि रंगभरी एकादशी या नावाने ओळखली जाते. पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 20 मार्चला दुपारी 12:12 वाजेपासून दिवशी म्हणजेच 21 मार्चला दुपारी 2:22 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार बुधवार 20 मार्चला एकादशीचं व्रत पाळलं जाणार आहे.
अमलकी एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ
अमलकी किंवा आमला एकादशीचे व्रत गुरुवार, 21 मार्चला सोडलं जाणार आहे. उपवास सोडण्याची वेळ दुपारी 1:41 वाजेपसाून ते 4:07 वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी पारण करून व्रताची समाप्ती करावी.
अमलकी एकादशीचे महत्त्व
शास्त्रानुसार अमलकी एकादशीला विशेष मानले गेली आहे. या दिवशी व्रत केल्यास पापांचा नाश होतो आणि मनोकामना पूर्ण होतात असं म्हणतात. या एकादशीला भगवान विष्णू, माता लक्ष्मी तसंच आवळा वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. असं म्हणतात की, आवळामध्ये देव-देवतांचा वास असतो. जे लोक दीर्घकाळापासून आपल्या जीवनात अनेक अडचणी आणि समस्यांना तोंड देत असतात त्यांनी विशेषतः अमलकी एकादशीचे व्रत पाळल्यास फायदा मिळतो, अशी मान्यता आहे.
अमलकी एकादशी पूजा विधी
अमलकी एकादशीला सकाळी लवकर उठून आंघोळीनंतर स्वच्छ कपडे परिधान करा त्यानंतर मंदिर स्वच्छ करुन भगवान विष्णूचे ध्यान करा. त्यानंतर उपवासाचं व्रत घ्या. यानंतर विधीनुसार भगवान विष्णूची पूजा करा. विष्णु सहस्त्रनाम पाठ करा. आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्यावर रोळी, चंदन, फुलं आणि अक्षत अर्पण करा. पूजेदरम्यान, भगवान विष्णूला आवळा अर्पण करुन भगवान विष्णूसह सर्व देवी-देवतांची आरती करा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)