Amalaki Ekadashi 2023 : आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग, `ही` एक चूक करू नका!
Amalaki Ekadashi 2023 : सर्व पाप नष्ट करणारी आमलकी एकादशी जवळ आली आहे. यावेळी ही एकादशी खूप खास आहे. कारण यावेळी आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग घडून आले आहेत.
Amalaki Ekadashi puja muhurat in marathi : वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. पण जर मास किंवा मलमासा असेल तर 26 एकादशीही येतात. यंदा 2023 मध्ये 26 एकादशी आहे. त्यातील 3 मार्चला येणारी आमलकी एकादशी ही विशेष असते. असं म्हणतात की एक हजार गाईंच्या फळाएवढे पुण्य प्राप्त होतं. तर आमलकी एकादशीचं व्रत केल्यास आपलं सगळे पाप नष्ट होतात. यावेळी आमलकी एकादशीला 3 अतिशय शुभ योग आले आहेत. या एकदाशीला भगवान विष्णू आणि आवळा वृक्षाची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार आवळा या वृक्षात देव देवतांचं वास असतं असं म्हटलं आहे. (Amalaki Ekadashi March 3 puja muhurat shubh yog and Dont make this one mistake in marathi)
3 अतिशय शुभ योग
आमलकी एकादशीला आमला एकादशी म्हणून पण ओळखलं जातं. या वर्षी शुक्रवारी येणारी एकादशीला तीन शुभ योग घडत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग आणि शोभन योग...त्यातील सर्वार्थ सिद्धी योग हे भक्तांना फलदायी ठरणार आहे.
मुहूर्त
सर्वार्थ सिद्धी योग - सकाळी 6.45 ते दुपारी 3.43 पर्यंत
सौभाग्य योग - सूर्योदयापासून संध्याकाळी 06:45 पर्यंत
शोभन योग - 06:45 पासून 4 तारखेला सकाळपर्यंत
सर्वार्थ सिद्धी मुहुर्तावर करा विशेष पूजा
सर्वार्थ सिद्धी या शुभ योगावर पूजा केल्यास तुम्हाला देवदेवतांचा विशेष आशिर्वाद मिळेल. आमलकी एकादशीला सकाळी 06:45 ते सकाळी 11:06 वेळ पूजा केल्यास ती पूजा तुम्हाला लाभेल. या वेळेत भगवान विष्णू आणि आवळ्याच्या झाडाची पूजा करा आणि मोहरीचं तेल अर्पण करा. या मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होईल.
मात्र हे करु नका!
आमलकी एकादशीला आवळा वृक्ष आणि त्याच्या फळाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या एकादशीला नुसत व्रत करु चालत नाही. तर आवळा वृक्षाची पूजा करा. भगवान विष्णूला भोग आणि प्रसादात आवळा दाखवायला विसरु नका. नाही तर तुमची पूजा आणि व्रत याला काही उपयोग राहत नाही. तुम्हाला त्याचं फळ मिळतं नाही.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)