Anant Chaturdashi 2023 : यथासांग पाहुणचार झाल्यानंतर आपल्या लाडका बाप्पा (Ganeshchaturthi 2023) आज अनंत चतुर्दशीला गावी (Ganesh Visarjan 2023) परतणार आहे. आज अतिशय शुभ असा योगायोग जुळून आला आहे. वृद्धी आणि रवि योग आहे. आज भगवान विष्णूची पूजा केली जाते. आयुष्यातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी शास्त्रात विष्णू भगवानची पूजा झाल्यानंतर एक बांधा बांधण्यास सांगतात. कुठला धागा बांधायचा असतो, तो बांधण्याचा विधी आणि नियम जाणून घेणार आहोत. (anant chaturdashi why is anant sutra tied on the hand 14 knot significance and importance)


अनंत धागा किंवा रक्षासूत्र  (anant sutra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हातावर रक्षासूत्र बांधतात. या रक्षासूत्राला अनंत धागा असंही म्हणतात.  या धाग्याला 14 गाठी असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी याचं विशेष महत्त्व आहे. या 14 गाठी बांधणं अतिशय शुभ मानले जाते. हा धागा म्हणजे कापूस किंवा रेशीम धागा असू शकतो. तर पौराणिक मान्यतेनुसार 14 गाठी म्हणजे भगवान विष्णूच्या  14 रुपांचं प्रतीक असतं. 


अनंत धागा हा महिलांनी आपल्या डाव्या हाताला तर पुरुषांनी उजव्या हाताला बांधावे. हा धागा बांधल्यामुळं भगवान विष्णू भक्तांच्या सर्व अडचणी, दु:ख दूर करतात आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारतात. असं म्हणतात जे लोक हे व्रत 14 वर्ष करतो त्याला विष्णूलोकाची प्राप्ती होते. त्यामुळे ज्यांना हे व्रत शक्य नाही त्यांनी आठवणीने 14 गाठी अनंत धागा नक्की बांधावा. त्याशिवाय हा धागा 14 दिवस हातावर राहू द्यायचा. त्यानंतर 14 दिवसांनी ते पूजास्थळी ठेवावे. अनंतसूत्र बांधल्यानंतर 14 दिवस मांसाहार, मद्य किंवा तामसिक आहार घेऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. 


हेसुद्धा वाचा - Anant Chaturdashi 2023 : अनंत चतुर्दशीला मीन राशीत चंद्र देव करणार गोचर, 3 राशींना होणार लाभ


रक्षासूत्र बांधण्याचा मंत्र


अनंन्तसागर महासमुद्रे मग्नान्समभ्युद्धर वासुदेव।


अनंतरूपे विनियोजितात्माह्यनन्तरूपाय नमो नमस्ते॥


हेसुद्धा वाचा - Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)