Annapurna Jayanti 2022: 8 डिसेंबरला अन्नपूर्णा जयंती, या दिवशी चुकूनही करू नका अशी कामं
Annapurnna Jayanti 2022: हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. अन्नपूर्णा जयंती डिसेंबरमध्ये मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी माता पार्वतीने अन्नपूर्णा मातेचा अवतार घेतला होता.
Annapurna Jayanti 2022: मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अन्नपूर्णा जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णाने (Annapurna) पृथ्वीवर जन्म घेतला होता. अन्नपूर्णा देवी पार्वतीचा अवतार आहे. या दिवसांचं औचित्य साधत मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते. यावर्षी अन्नपूर्णा जयंती (Annapurna Jayanti) 8 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाक घराची स्वच्छता केली जाते आणि देवीची उपासना केली जाते. अन्नपूर्णा जयंतीला आळणी जेवण करावी अशी मान्यता आहे. हिंदू पंचांगानुसार अन्नपूर्णा जयंती 8 डिसेंबरला साजरी केली जाईल. अन्नपूर्णा जयंती या बाबी करू नये
अन्नाचा अपमान- अन्नपूर्णा जयंतीला अन्नाचा अपमान करू नये. या दिवशी अन्नाचा अपमान केल्याने अन्न, धन रितं होत जातं.
घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान- अन्नपूर्णा जयंतीला घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये. या दिवशी घरी आलेल्या व्यक्तीला जेवण द्यावं. घरी कोणी भिक्षुक आल्यास त्याला अन्नदान करावं.
तामसिक भोजन- अन्नपूर्णा जयंतीला घरी तामसिक भोजन करू नये. या दिवशी अन्नात कांदा आमि लसणाचा वापर करू नये. अन्यथा अन्नपूर्णा देवी नाराज होईल आणि नुकसान होऊ शकतं.
मिठाचं दान करू नये- या दिवशी दान-धर्म करणं शुभ मानलं जातं. मात्र या दिवशी कोणालाही मीठ देऊ नये किंवा त्याचा वापर करू नये. अशी मान्यता आहे की, घरात ठेवलेलं मीठ कोणालाही दान किंवा वापरण्यास देऊ नये.
स्वच्छता- घरात सकारात्मक उर्जेसाठी स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे. स्वयंपाक घर स्वयंपाक घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. सकाळी स्नान केल्यानंतर स्वयंतपाक घर व्यवस्थितरित्या स्वच्छ करावे.
बातमी वाचा- Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!
काय आहे पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, पृथ्वीवर भयंकर दुष्काळ पडला होता. सर्वत्र अन्नासाठी लोकं हाहाकार माजला होता. अन्नावाचून लोकं तडफडत होते. पृथ्वीवरील ही स्थिती पाहून देवांनी भगवान शंकराकडे धाव घेतली आणि प्रार्थना केली. त्यानंतर भगवान शिवाने ऋषींचा वेश धारण करून अन्नपूर्णा देवीकडे अन्नाची मागमी केली. अन्नपूर्णा देवीच्या या दानामुळे लोकांचा प्रश्न सुटला.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)