मुंबई : सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे, म्हणून त्याला अग्नि तत्व असलेली राशी म्हणतात. म्हणूनच या राशीचे लोक मजबूत आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाचे मालक असतात. अशी लोकं पुढे जाऊन चांगले नेते बनतात आणि राजकारण आणि प्रशासनात उच्च पदांवर पोहोचतात. अशा परिस्थिती या राशीच्या लोकांचं 2022 हे वर्ष कसं असेल, ते जाणून घेऊया ज्योतिषी वेदश्वपती आचार्य आलोक यांच्याकडून.


सिंह राशीभविष्य 2022 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंह राशीच्या लोकांच्या नेतृत्वगुणामुळे त्यांना या वर्षी खूप फायदा होईल. ते करिअरमध्ये प्रगती करतील परंतु आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत त्यांना हा वर्ष त्रासदायक राहील.


करिअर


सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष माता लक्ष्मीची उपासना करून त्यांची अपार कृपा प्राप्त करण्याचे वर्ष आहे. तुमच्या राशीतील गुरु तुम्हाला व्यवसायात लाभ देईल, तर राहु परदेशी संबंधात लाभ मिळवून देईल.


या वर्षी मार्चनंतर कामानिमित्त सहलीचे योग येतील. जर शत्रूंनी कामाच्या ठिकाणी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, तर तुमच्या शनी तुम्हाला या समस्यांपासून वाचवेल आणि तुम्हाला मान, पद आणि प्रतिष्ठा देईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये काळजीपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतं.


कौटुंबिक जीवन


या वर्षात कुटुंबात चांगले सामंजस्य राहील. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.


आर्थिक विभाजनामध्ये कुटुंबातील कोणतीही स्त्री कायदेशीर समस्या निर्माण करू शकते. या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंध चांगले राहतील. गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या वर्षी तुमचा गुरू ग्रहाला मजबूत करण्यावर भर द्या आणि कोणत्याही प्रकारची प्राणी हत्या टाळा.


विद्यार्थी जीवन


या वर्षी तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यशस्वी होईल. दुसरीकडे, राहू आणि केतू तुम्हाला चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता देतील. जर तुम्ही प्रशासकीय परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष संमिश्र जाईल.


आरोग्य


आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. कारण आगोर्याशी संबंधीत त्रास उद्भवू शकतात तर अपघात होण्याची शक्यता देखील आहे. या वर्षी तुम्ही उच्च रक्तदाब आणि मधुमेह, श्वसनाचा आजार याच्याशी संबंधित आजारांमुळे त्रस्त असाल. आयुर्वेदिक उपचार केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात.


उपाय


आरोग्य सेवेसाठी आयुर्वेदिक डॉक्टरांची मदत घ्या. रोज 28 ग्रॅम पीठाची रोटी बनवून गायीला खाऊ घाला. सकाळी सूर्यासमोर ऊं कृत्तिका सुहवम अस्तु. ॐ सूर्य शिवास्तु मंत्राचा २८ वेळा जप करा.


(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. झी24 तास याची पुष्टी करत नाही.)