Apara Ekadashi 2023 : अपरा एकादशी म्हणजे आज Bhadrakali Jayanti! अमाप समृद्धी देणाऱ्या व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
Apara Ekadashi 2023 : पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील आज एकादशी आहे. तिला अपरा एकादशी आणि भद्रकाली जयंती (Bhadrakali Jayanti 2023) असंही म्हणतात. अमाप समृद्धी देणाऱ्या व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
Apara Ekadashi 2023 : पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतं असतात. ज्येष्ठ महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यातील कृष्ण पक्षाला येणारी पहिली एकादशी आज आहे. तर दुसरी एकादशी शुक्ल पक्षाला येते. कृष्ण पक्षातील एकादशीला अपरा एकादशी असं म्हणतात. त्याशिवाय ज्येष्ठ महिन्यातील (Jyeshta ekadashi 2023)अपरा एकदाशीला भद्रकाली जयंतीदेखील (Bhadrakali Jayanti 2023) साजरी केली जाते.
भद्रकाली जयंती ही दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. आज भद्रकाली मातेच्या रूपाची पूजा केली जाते. असं म्हणतात की, यादिवशी भद्रकालीची पूजा केल्याने सर्व रोग, दोष आणि दुःख आपल्या आयुष्यातून नाहीसे होतात.
तर अपरा एकदाशी ही अपार संपत्ती आणि सर्व पापांचा नाश करुन पुण्य देणारा भाग्यशाली दिवस मानला जातो.
अपरा एकादशी 2023 मुहूर्त (Apara Ekadashi 2023 Muhurat)
पंचांगानुसार, ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अपरा एकादशी तिथी 15 मे 2023 ला पहाटे 2.46 वाजता सुरू झाली आहे. उद्या मंगळवारी 16 मे 2023 ला पहाटे 1.03 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार आज एकादशीचं व्रत केलं जाणार आहे.
अपरा एकादशीच्या उपवासाची वेळ - आज सकाळी 06.41 पासून मंगळावारी 16 मे 2023 सकाळी 08.13 वाजेपर्यंत
विष्णूजींच्या पूजेची वेळ - आज सकाळी 08.54 पासून सकाळी 10.36 वाजेपर्यंत
अपरा एकादशीचे महत्त्व (Apara Ekadashi Significance)
धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की, अपरा एकादशीचं व्रत केल्याने गंगेच्या तीरावर पितरांना पिंडदान अर्पण केल्याने जे पुण्य मिळतं, तेवढं फळ मिळतं. त्यामुळे अनेकांना गंगेच्या तीरावर जाणून पितरांना पिंडदान करता येतं नाही. त्यामुळे हे पुण्य मिळवण्यासाठी एकादशीचं व्रत केलं जातं. आजच्या दिवशी बद्रीनाथ मंदिरात जाऊन पूजा करावी. त्याशिवाय सोन्याचे दान केल्याने अपरा एकादशीचं पुण्य प्राप्त होतं असं म्हणतात. या एकादशीला काही ठिकाणी अजला एकदाशी असंही म्हणतात. एकादशीचं व्रत आणि श्री हरीची पूजेसोबत ब्राह्मणांना दान केल्यास अपार संपत्ती प्राप्त होते.
अपरा एकादशी पूजा विधी (Apara Ekadashi Puja Vidhi)
सकाळी उठून आंघोळ करा.
त्यानंतर श्रीहरीला केली, आंबा, पिवळी फुलं, पिवळं चंदन, पिवळं वस्त्र अर्पण करा.
पूजा करताना ऊं नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.
विष्णु सहस्त्रनाम पाठ केल्याने घरात सकारात्मक ऊर्जाचा वास राहतो.
अपरा एकादशी उपाय (Apara Ekadashi Upay)
आज अपरा एकादशीला पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जलसेवा करा.
पशू, पक्षी, मानव यांना उष्णतेपासून मुक्ती मिळण्यासाठी अन्नदान आणि पाणी दान करा.