Ashadha Amavasya 2023 : आषाढ महिना सुरु आहे. त्यात वारकरी विठुरायाचा भेटीसाठी लाखो मैल पायपीट करत माऊलीमय भक्तीत दंग होत वारीसाठी निघाले आहेत. हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या कधी आहे याबद्दल जाचकामध्ये संभ्रम आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील शेवटच्या दिवशी अमावस्या असते. या दिवशी पितरांसाठी स्नान, दान  या महत्त्व आहे. यंदा आषाढ अमावस्येच्या तिथीबाबत लोकांमध्ये साशंकता आहे. आषाढ अमावस्येची नेमकी तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घेऊया.


17 किंवा 18 जून आषाढ अमावस्या कधी आहे?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मात पंचांगाला महत्त्व आहे. या पंचांगात शुभ अशुभ मुहूर्ताशिवाय नक्षत्र, चंद्राची स्थिती, सूर्योदय चंद्रोदय या सगळ्याबद्दल रोजच्या दिवशी सांगितलं जातं. या पंचांगानुसार शनिवारी 17 जून 2023 ला सकाळी 09.13 वाजता अमावस्या सुरु होणार असून दुसऱ्या दिवशी रविवारी 18 जून 2023 ला संपणार आहे. 


या तिथीला सूर्य आणि चंद्र एकाच राशीत असतात. हा योगायोग 18 जूनला घडणार आहे. या दिवशी सूर्य आणि चंद्र मिथुन राशीमध्ये भेटणार आहेत. त्यामुळे आषाढ कृष्ण पक्षातील अमावस्या 18 जून 2023ला असणार आहे. या दिवशी स्नान आणि दान केले जाईल. तर, 17 जूनला श्राद्ध वगैरे अमावस्या केली जाणार आहे. 


आषाढ अमावस्या 2023 मुहूर्त


स्नानाची वेळ - पहाटे 04.03 ते पहाटे 4.43 वाजेपर्यंत 


अभिजित मुहूर्त - सकाळी 11.54 - दुपारी 12.50


अमावस्येच्या दिवशी काय करावे?


वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या तर शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनिश्चरी अमावस्या असं म्हणतात. आषाढ कृष्ण पक्षातील अमावस्येचं महत्त्व शास्त्रातही सांगण्यात आलंय. दर महिन्याच्या अमावास्येला पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी आणि पितरांचा आशीर्वाद मिळावा म्हणून अमावस्येच्या दिवशी दूध आणि तांदळाची खीर अर्पण करावी. त्यामुळे पूर्वज प्रसन्न होतात असं म्हणतात. 


आषाढ अमावस्येला 'हे' काम करू नका


अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असल्याने या दिवशी शुभ कार्य करु नयेत, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या दिवशी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी-विक्री टाळा आणि गृहप्रवेश, मुंडन, शुभ कार्य करू नका, कारण यामुळे अशुभ परिणाम दिसतात. 


3 महादोषांपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय 


पितृदोष 


पितृदोष असेल तर पती-पत्नीमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता असतं, असं सांगण्यात आलं आहे. अशावेळी आषाढ अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी तर्पण करावं. ब्राह्मणाला अन्नदान करा. गायी, कुत्रे, कावळे, मुंग्यांना अन्नदान करा. 


शनि दोष 


अमावस्या ही शनिदेवाची जन्मतारीख मानली जाते. कुंडलमध्ये शनिदेवाची महादशा चालू असेल, साडेसाती किंवा धैय्याचा अशुभ स्थिती असेल, तर अमावस्येला संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर तेलाचा दिवा लावून 5 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. 


काल सर्प दोष 


कुंडलीत काल सर्प दोष असेल तर व्यक्ती निपुत्रिक राहतो किंवा मूल आजारी पडतात. नोकरी जाते, तुम्ही कर्जबाजारी होता. अशावेळी कालसर्प दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आषाढ अमावस्येला शिवलिंगाची विशेष पूजा करा. महामृत्युंजयाचा जप करा किंवा चांदीच्या नागांची पूजा करून त्याला नदीत प्रवाहित करा. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )