मुंबई : आषाढ महिन्यात येणारी अमावस्या यावेळी 2 दिवस टिकणार आहे. 28 जून रोजी ही अमावस्या असणार आहे, तर स्नान- दान 29 जून रोजी असणार आहेत. तसं पाहिलं तर वर्षातल्या सर्व अमावस्या महत्त्वाच्या असतात. पण, आषाढ महिन्यातील अमावस्येला अतिशय महत्त्वं प्राप्त आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण चातुर्मास सुरु होण्यापूर्वीची ही शेवटची अमावस्या. शास्त्रांमध्ये आषाढ महिन्यात अमावस्येच्या दिवशी काही कामं करण्यावर बंधनं आहेत. ही कामं प्रसंगी संकटांना बोलावणंही पाठवतात. 


कोणती कामं करु नये
- तसं पाहिलं तर, घरात भांडणतंटे करुच नयेत. अमावस्येच्या दिवशी विषेश म्हणजे वाद करुच नका. असं केल्यास पितरं नाराज होतात आणि आयुष्यात अडचणी येतात. 


- अमावस्येच्या दिवशी प्रवास करणं टाळा. अशा दिवसांना केलेला प्रवास फळत नाही. 


- अमावस्येच्या दिवशी केस कापू नका. नखंही कापणं टाळा. 


- अमावस्येच्या दिवशी कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. असं केल्यास चंद्रस्थानावर परिणाम होतो. 


- अमावस्येच्या रात्री कधीही निर्मनुष्य ठिकाणी किंवा स्मशानात जाणं टाळा. कारण, त्यावेळी इथं नकारात्मक शक्तींचा वास असतो. 


(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)