Mangal Margi in January 2023: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचं स्वत:चं असं अस्तित्व आहे. गोचर कालावधी आणि त्यामुळे होणारे परिणाम याचं गणित बांधलं जातं. नऊ ग्रहातील मंगळ हा विवाह, भूमि, धैर्य, पराक्रम आणि संपत्तीचा कारक ग्रह आहे. लग्नासाठी कुंडलीत मंगळाच्या स्थितीला खूप महत्त्व दिले जाते. मंगळ अशुभ असेल तर व्यक्ती गर्विष्ठ, क्रोधी बनते. 2023 च्या सुरुवातीला मंगळ ग्रह गोचर करणार आहे. मंगळ सध्या वृषभ राशीत आहे आणि वक्री स्थितीत आहे. 13 जानेवारी 2023 पासून मंगळ  वृषभ राशीत मार्गस्थ होणार आहे. या स्थितीचा 3 राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. चला जाणून घेऊयात 2023 या वर्षातील नशिबवान राशी कोणत्या आहेत?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष: या राशीच्या लोकांसाठी मंगळाची स्थिती लाभदायक सिद्ध होऊ शकते. या काळात आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारल्याने दिलासा मिळेल. अध्यापन, मार्केटिंग, मीडिया इत्यादी भाषणाशी संबंधित क्षेत्रात सक्रिय असलेल्या लोकांना करिअरमध्ये फायदा होऊ शकतो.


सिंह: या राशीच्या लोकांसाठी मंगळ मार्गस्थ होणं शुभ राहील. या लोकांना करिअरच्या क्षेत्रात जास्तीत जास्त फायदा होईल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. तसेच उत्पन्नात वाढेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सध्याच्या नोकरीत तुम्हाला बढती मिळू शकते. जबाबदाऱ्या वाढतील आणि तुम्ही त्या आनंदाने पूर्ण कराल.


बातमी वाचा- घरात वटवाघुळ दिसताच मिळतात हे संकेत; वास्तुशास्त्रानुसार काय घडतं?


कन्या: मंगळ मार्गस्थ होताच कन्या राशीच्या लोकांना फायदा होईल. नशीब या लोकांना साथ देईल. आतापर्यंत रखडलेली कामे मार्गी लागतील. कामात यश मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. एखादी महत्त्वाची योजना पूर्ण होऊ शकते. परदेशी सहलीला किंवा लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)