मेष- गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. धन हानी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थांना अधिक मेहनत करण्याची गरज आहे. जवळची व्यक्ती तुमचा गैरफायदा उचलू शकते. आरोग्याची काळजी घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- व्यावसायात वाद होण्याची शक्यता आहे. मेहनत देखील वाढू शकते. आज आपण लहान गोष्टींनी व्यथित होऊ शकता. काही कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. पैश्यांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा मोठा निर्णय घेवू नका. अनुभवी व्यक्तींचा विचार घ्या. दिवस सामान्य स्वरूपाचा राहील. 
   
मिथुन- पगारवाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी मदत मिळू शकेल. साथीदारासह वेळ घालवाल. अनेक गोष्टींमध्ये नशिबाची साथ लाभेल. व्यवसायात अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. पोटाचे विकार डोकंवर काढतील.
      
कर्क- एकाच वेळी अनेक कामे हाती येतील, त्यामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. व्यवहारात सावानता बाळगा.काही लोक परिश्रम आणि परिणामांमुळे असमाधानी असू शकतात. डोकं दुखीची समस्या जाणवेल.
    



सिंह- व्यावसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगल्या स्वरूपाचा आहे. गुंतवणूकीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांसाठी लग्नासाठी मागणं येण्याची शक्यता आहे. विद्यार्थांसाठी मेहनतीचा दिवस आहे. करियरमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या जबाबदाऱ्या खांद्यावर येण्याची शक्य़ता आहे. 
    
कन्या- आज वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. काहीही बोलण्याआधी विचार करा. तुमच्या बोलण्याने वाद होण्याची शक्यता आहे. आज धोकादायक सौदे करणे टाळा. उधार दिलेले पैसे पुन्हा मिळवण्यासाठी अधिक कसरत करावी लागेल. 
     
तूळ- आर्थिक दृष्टिकोनातून तुमचा दिवस सामान्य असेल. पती-पत्नी मधील गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थांसाठी दिवस काही प्रमाणात नकारात्मक स्वरूपाचा असेल. वडिलांच्या आरोग्यावर विशेष लक्ष द्या. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या.
    
वृश्चिक- कामाच्या ठिकाणी अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात काही कामे अर्धी राहू शकतात. अधिकाऱ्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजात विचारपूर्वक निर्णय घ्या.
 
धनु- नोकरी करणाऱ्यांसाठी दिवस चांगल्या स्वरूपाचा आहे. उच्चपद मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. ऑफीसमध्ये नवं काम मिळण्याची शक्यता आहे. 
   
मकर- भागीदारी व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थीवर्गाला मेहनतीचे फळ नक्की मिळेल. जुन्या गुंतवणूकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. महत्वची कामे मार्गी लागतील. नव्या कामांना सुरूवात करण्याचा विचार कराल. आज तुमची तब्येत सामान्य राहील.


कुंभ- व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. विद्यार्थांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. साथीदारासह बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. खाजगी आयुष्यासाठी दिवस चांगला आहे. आरोग्य सामान्य राहील. डोक दुखीची समस्या जाणवेल. मतभेदांचा सामना करण्याची शक्यता आहे. 


मीन- सरकारी अधिकाऱ्यांसाठी दिवस चांगल्या स्वरूपाचा आहे. अधिकाऱ्यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. नशीबाची साथ लाभेल. नोकरी आणि व्यवसाया संबंधीत कामे व्यवस्थित पार पडतील. प्रयत्नांनंतर अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. अचनाक येणाऱ्या अडचणींचा सामना कराल.