Rules For Chanting Mala: हिंदू धर्मात रुद्राक्ष माळ धारण करणे खुप शुभ मानले जाते. भगवान महादेवाचा जप करताना रुद्राक्ष माळेचा वापर करतात. रुद्राक्ष माळेचा वापर करताना मंत्रजापही केला हातो. या जपमाळेने भगवान महादेव प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे. तसंच, भगवान विष्णु यांची अराधना करण्यासाठी चंदन व तुळशी माळ वापरली जाते. तसंच, श्री कृष्ण यांचं नाव जपताना वैजयंती माळेचा वापर केला जातो. तर, देवी लक्ष्मीची आराधना करण्यासाठी कमलगट्टेच्या माळेचा प्रयोग केला जातो. चंद्र देवाची पूजा करण्यासाठी मोतीच्या माळेचा जाप केला आहे. प्रवाळ जपमाळेने मंगल देवीची पूजा केली जाते आणि भगवान बृहस्पतिचे मंत्र हळदीच्या जपमाळेने जपले जातात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये जपमाळ जपण्याचे नियम काय आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.


जपमाळ जपण्याचे नियम जाणून घेऊयात 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवाची आराधना करताना किंवा मंत्र उच्चारताना जपमाळेचा उपयोग करत आसाल तर एखादे साफ व स्वच्छ आसन घ्यावे आणि त्यावरच बसावे. लक्षात घ्या की, आसन न घेता तसंच जपमाळ केला तर जप करुन मिळवलेले सर्व पुण्य नष्ट होते. 


त्याचबरोबर, जपमाळ करताना त्या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेला असावे. तसंच, माळ जपताना माळ नेहमी हृदयचक्राच्या जवळच असावी. 


जपमाळ करताना नेहमी मधल्या बोटाचा वापर करावा. तर, मोती किंवा त्यातील रुद्राक्ष बदलण्यासाठी अंगठ्याचा वापर करावा. तसंच, मोती बदलताना लक्षात घ्या की तो स्वतःच्या दिशेने ओढा. 


जपमाळ करण्याआधी त्या व्यक्तीने स्वच्छ आंघोळ करुन घ्या. त्याचबरोबर शांत वातावरण आणि शुद्ध ठिकाणी बसूनच जपमाळ करावी. तसंच, एखादा व्यक्ती ब्राह्म मुहूर्तावर माळेचा जाप केल्यास अधिक फलदायी असते. 


माळ जपताना ही चुक करु नका 


ज्या माळेने तुम्ही जाप करणार आहात ती कधीच गळ्यात धारण करु नये. उपासना झाल्यानंतर जपमाळ देवघरात चांगल्या ठिकाणी ठेवा. दुसऱ्याकोणाची माळ वापरुन जप करु नका. तसंच, तुमची माळ इतर कोणत्या व्यक्तीलाही देऊ नका. मंत्राचा जाप करताना कधीच मनात नकारात्मक विचार आणू नका. असं केल्यास मंत्रजापचा फळ नष्ट होऊ शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )