Hanuman Krupa On Zodiac Signs: रामभक्त हनुमान चिरंजीवी असून कलयुगात त्यांच्या पूजा विधी आणि उपासनेला महत्त्व आहे. मंगळवार आणि शनिवारी हनुमंताची पूजा केली जाते. मंगळवार हा मारुतिरायाला समर्पित वार आहे. हनुमानाची मनोभावे पूजा केल्यास भक्तांवरील संकट दूर होतं. तसेच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते. हनुमंताची पूजा केल्याने शनिदेवांचा प्रभाव कमी होतो. ज्योतिशास्त्रानुसार 12 राशींपैकी 3 राशींवर मारुतिरायाची विशेष कृपा असते. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुंभ- ही राशीचक्रातील 11 वी रास आहे. जेव्हा चंद्र धनिष्ठाच्या अर्ध्या भागातून, संपूर्ण शतभिषामधून आणि पूर्वाभद्राच्या 2/3 भागातून जातो, तेव्हा या नक्षत्रांत जन्मलेले लोक कुंभ राशीचे असतात. या राशीचा स्वामी शनिदेव आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या जातकांवर मारुतिरायाची विशेष कृपा असते. यामुळे या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळतं. तसेच जीवन आनंदमयी असतं. हनुमंताची कृपा असल्याने आर्थिक स्थितीही चांगली असते. 


सिंह- ही राशीचक्रातील पाचवी रास आहे. या राशीचं चिन्ह सिंह आहे. तसेच राशी स्वामी सूरय असून अग्नि तत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या राशींवर हनुमंताची कृपा असते. या राशीच्या लोकांनी हनुमानाची विशेष पूजा केल्यास आर्थिक संकट दूर होतं. त्याचबरोबर संकटमोचक हनुमान संकटातून मुक्त करतो.


बातमी वाचा- Kalashtami 2022: कालाष्टमीला हे उपाय करून मिळवा कालभैरवाची कृपा, जाणून घ्या पूजा विधी आणि मुहूर्त


मेष- ही राशीचक्रातील पहिली रास असून या राशीचं चिन्ह मेंढा आहे. या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीवरही बजरंगबलीची विशेष कृपा असते. मेष राशीच्या लोकांची इच्छाशक्ती खूप प्रबळ असते. हनुमानजींच्या आशीर्वादाने मेष राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. पण वाईट व्यसनाला बळी पडल्यामुळे त्यांच्याकडे पैशांची कमतरता भासू शकते.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)