Astrology 2023 : पितृपक्षाच्या अष्टमीला अद्भुत योग! 3 राशींवर बरसणार भगवान शंकरांची कृपा
Astrology 2023 : भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला अतिशय शुभ योग जुळून आला आहे. दोन अद्भुत योगामुळे तीन राशींना फायदा होणार आहे.
Luckiest Zodiac Sign, 6 October 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक दिवशी नक्षत्र, ग्रह आणि योग तयार होत असतात. हे योग कधी अशुभ असतात तर कधी ते अतिशय शुभ असतात. या योगांचा परिणाम 12 राशींवर दिसून येतो. भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला अतिशय दुर्मिळ आणि अद्भूत योग जुळून आला आहे. त्यामुळे तीन राशींना धनलाभासोबत करिअरमध्ये प्रगती होणार आहे.
यादिवशी काही भागात आज जितिया व्रत केलं जाणार आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. रात्री 09:32 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 06:17 पर्यंत असणार आहे. सर्वार्थ सिद्धी योगासोबत शिवयोग देखील आहे. या दोन योगामुळे तीन राशींना फायदा होणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या. (astrology today horoscope 6th october due 2 amazing coincidences luck of these 3 zodiac signs Sarvartha Siddhi Yoga and Shiv Yog)
'या' राशी होणार मालामाल
मेष (Aries Zodiac)
या दोन शुभ संयोगामुळे मेष राशीसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. या योगामुळे मालमत्ता आणि वाहन खरेदीची योग तयार झाले आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. भगवान शिवाच्या कृपेने कार्यक्षेत्रात लाभ होणार आहे. पैसे कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहे. मुलांकडून चांगली बातमी कानावर पडणार आहे. यावेळी लक्ष्मी देवीच्या विशेष आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
या दोन योगायोगांमुळे भगवान शिवासोबतच तूळ राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसणार आहेत. गुंतवणुकीतून नफा आर्थिक स्थिती सुधारणार आहे. व्यवसायात नफा कमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीत वाढ झाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
मीन (Pisces Zodiac)
शिव योग आणि सर्वार्थ सिद्धी योग मीन राशीच्या लोकांसाठी नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे. मुलांकडून तुम्हाला नवीन आनंद मिळणार आहे. परदेशात नोकरीच्या संधी उपलद्ध होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)