Tulsi Vivah 2022 : सनातन धर्मातील पवित्र झाड म्हणून तुळशीकडे (tulsi vivah) पाहिलं जातं. ज्या घरात तुळशीचं झालं आहे, त्या घरात आनंद आणि लक्ष्मीचा सहवास असतो असं मानला जातं.. दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाची गडबड सुरू होती. दिवाळीच्या चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह असतो (Tulsi Vivah 2022). तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आयोजित केला जातो. या तिथीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवूथनी एकादशी असेही म्हणतात. (when is tulsi vivah 2022)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उथनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू (Bhagvan Vishnu) 4 महिन्यांच्या दीर्घ झोपेनंतर जागे होतात. ते झोपेतून जागे झाल्यानंतर शुभ मुहूर्ताला सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूच्या शालिग्राम अवताराशी तुळशीसोबत विवाह करण्याची परंपरा देखील आहे. (tulsi vivah story)


या विवाहाबरोबरच सर्व धार्मिक आणि शुभ कार्येही सुरू होतात. असे मानले जाते की भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची श्रद्धेने पूजा केल्याने लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लग्नाच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात. (Auspicious time and timing for Tulsi Vivah)


2022 मध्ये तुळशी विवाहासाठी शुभ मुहूर्त (Tulsi Vivah 2022)
तुळशी विवाह 2022 : शनिवार 5 नोव्हेंबर 2022
कार्तिक द्वादशी तिथी सुरु : 5 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 6:08 वाजता
द्वादशी तारीख समाप्ती : 6 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 5:06 वाजता
तुळशी विवाह परण मुहूर्त : 6 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:09:56 ते 03:18:49 पर्यंत


असा करतात तुळशी विवाह 
तुळशी विवाहामध्ये तुळशीला अगदी वधूच्या रुपात सजवलं जातं. तुळशीचा विवाह शाळीग्राम दगडाडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हे विष्णूचं रुप समजलं जातं. तर काही ठिकाणी तुळशीचा विवाह हा लहान मुलासोबत देखील लावला जातो. त्या लहान मुलाला अगदी नवरदेवाप्रमाणेच सजवलं जातं. (how to do tulsi pooja at home daily)