Baba Vanga 2022 Prediction: बाबा वेंगा यांची धक्कादायक भविष्यवाणी, पुढच्या वर्षी होणार विनाश
काही दिवसांनी नव्या वर्षाची सुरूवात होणार, पण...
मुंबई : काही चांगल्या वाईट आठवणींनी 2021 हे वर्ष आता संपणार आहे. काही दिवसांनी नव्या वर्षाची सुरूवात होणार आहे. असं असताना काही प्रसिद्ध भविष्यवक्त्यांची भविष्यवाणी समोर आली आहे. बल्गेरियात राहणारे अंध वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा उर्फ बाबा वेंगा हे एक प्रसिद्ध भविष्यवक्ते आहेत. असे म्हणतात की दृष्टी नसतानाही त्यांना भविष्य स्पष्टपणे सांगता येतं.
त्यांचे अनेक भाकीत खरे ठरल्याचं मानलं जातं. 2022 या वर्षासाठी त्यांनी काय भाकीत केले आहे ते जाणून घेऊया.
जगात होणार पाणी टंचाई
वेंगा बाबा यांच्या मते, 2022 मध्ये जगातील पाण्याचे संकट अधिक गडद होणार आहे. अनेक शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. नद्यांचं पाणी प्रदूषित होईल. पाण्याअभावी लोकांना इतर ठिकाणी स्थलांतर करावे लागणार आहे.
लोकांना लागेल गॅजेट्सचे व्यसन
बाबा वेंगा यांच्या अंदाजानुसार या वर्षी लोक मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवतील. त्यांची ही सवय हळूहळू व्यसनाचे रूप घेईल, त्यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल आणि ते मानसिक आजारी होतील.
सायहबेरियामध्ये मिळणार धोकादायक व्हायरस
जागतिक तापमानवाढीमुळे रशियाच्या सायबेरिया भागात बर्फ वितळण्यास सुरुवात होईल, त्यामुळे शास्त्रज्ञांची टीम प्राणघातक विषाणूचा शोध घेणार आहे. हा विषाणू खूप संसर्गजन्य असेल आणि वेगाने पसरेल. या संसर्गाचा सामना करण्यासाठी जगातील सर्व व्यवस्था अपयशी ठरतील.
भारतात तापमान 50 अंश असेल
जागतिक तापमानवाढीचा परिणाम भारतावरही होणार आहे. त्यामुळे देशातील अनेक भागात कमाल तापमान 50 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल. त्यामुळे देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल.
त्सुनामी आणि भूकंपाचा धोका
वेंगा बाबा यांच्यानुसार, 2022 मध्ये जगात भूकंप आणि त्सुनामीचा धोका वाढेल. हिंद महासागरातील भूकंपानंतर एक मोठी त्सुनामी उद्भवेल, जी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, भारतासह जगातील देशांच्या किनारी भागांना घेरेल. या सुनामीत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे.