Baba Vanga Prediction 2023:  नवीन वर्ष 2023 चे स्वागत करण्याच्या आणि 2022 ला निरोप देण्यासाठी काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. अशातच बल्गेरियाचे बाबा वेंगा (Baba Vanga Prediction) यांनी सन 2023 या वर्षासाठी केलेली भविष्यवाणी भारताची धडकी भरवणारी आहे. बाबा वेंगा भविष्यवाणीसाठी जगभर प्रसिद्ध असून त्याने सांगीतलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या देखील ठरल्या आहेत. सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा वेंगा यांनी 2023 मध्ये जी भविष्यवाणी केली आहे, त्यामध्ये 2023 मध्ये एक विनाशकारी सौर वादळ येणार आहे, ज्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. 2023 साली पृथ्वी व अन्य ग्रहांच्या हालचाली या वारंवार व वेगाने झाल्याने मानवी आयुष्यात मोठे बदल दिसून येऊ शकतात. पृथ्वीची कक्षा बदलून नैसर्गिक आपत्तीची शक्यता बाबा वेंगा यांनी व्यक्त केली आहे. तसेच पृथ्वीवर एलियन्सच्या हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे, असे त्यांचे मत आहे.


बाबा वेंगाच्या भविष्यवाण्यांनुसार, विनाशकारी सौर वादळाच्या वेळी, सूर्यातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेच्या स्फोटातून निघणारी धोकादायक किरणे पृथ्वीवर पडतील. जी अब्जावधी अणुबॉम्बइतकी विनाशकारी असू शकतात. तसेच बाबा वेंगाच्या भविष्यवाणीत असेही म्हटले आहे की, पृथ्वीवर दुसऱ्या ग्रहावरून येणाऱ्या शक्तींचा हल्ला होऊ शकतो. ज्यात लाखो लोक मारले जातील अशी शक्यता वर्तवली आहे. 


2023 मध्ये विनाशकारी काय घडणार?  


- बाबा वेंगा यांनी केलेल्या भाकितानुसार, 2023 मध्ये जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांचं पाहिल्यास रशिया-युक्रेन वाद खूपच चिघळला होता. जर भविष्यात यातून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी अणुबॉम्ब वापरण्याचे संकेत दिले होते. यानुसार बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरू शकते


-2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येऊ शकते. या सौर वादळांमुळे पृथ्वीच्या चुंबकीय शक्तीवर परिणाम होईल आणि त्यामुळे पृथ्वीच्या वेगात बदल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.


- 2023 मध्ये संपूर्ण जगात अंधार पसरू शकतो. एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात आणि त्यात लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.


- 2023 पर्यंत मानव प्रयोगशाळेत जन्माला येईल. प्रयोगशाळेत लोकांचे चारित्र्य, त्वचेचा रंग ठरवला जाईल.


- 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे.  


बाबा वेंगा कोण आहेत?


बल्गेरियातील नेत्रहीन वांगेलिया पांडवा गुश्तेरोवा उर्फ ​बाबा वंगा फकीर या एक जगप्रसिद्ध महिला ज्योतिष होत्या. बाबा वेंगा यांचे 1996 साली निधन झाले. विशेष म्हणजे बाबा वेंगा यांची भविष्यवाणी कुठेही लिहिलेली नाही. बाबा वेंगा यांनी सांगितलेली भाकिते अनुयायांकडून सांगितली जातात. दरम्यान, बाबा वेंगा यांच्या सर्वच भविष्यवाण्या खऱ्या होतात असे नाही. तरी मागील काही काळातील परिस्थिती पाहता अनेकवेळा बाबा वेंगा यांच्या भाकिताप्रमाणेच परिस्थिती निर्माण झाली होती. 2023 मध्ये वेंगा यांची भविष्यवाणी खरी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.