Budh Gochar In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र ठराविक वेळेनंतर आपल स्थान बदलतात. ग्रह जेव्हा त्यांच्या शत्रू आणि अनुकूल राशीमध्ये संक्रमण करत असतात तेव्हा 12 राशींवर त्याचा प्रभाव पडतो. ग्रहांचा राजकुमार बुधदेव 6 नोव्हेंबरला वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे जो बुध ग्रहाचा शत्रू मानला जातो. त्यामुळे शत्रू राशीत बुधाचं गोचर काही राशींसाठी घातक ठरणार आहे. या लोकांचे आर्थिक नुकसान तर होणार असून सोबत आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पडणार आहे. (Before Diwali Mercury enters enemy s house and budh transit scorpio health problems along with loss of wealth for people of these zodiac signs)


मेष रास (Aries Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकुमाराचा वृश्चिक राशीत प्रवेशामुळे मेष राशीच्या लोकांसाठी घातक ठरणार आहे. बुध ग्रह या राशीच्या आठव्या भावात भ्रमण करणार आहे. त्यामुळे यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे. या लोकांचे जुने आजार डोकं वर काढणार आहे. सर्दी, खोकला, ताप त्रासदायक ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. या काळात कोणतीही नवीन गुंतवणूक करु नका. त्याशिवाय वाहन जपून चालवा नाही अपघाताची भीती आहे. 


मिथुन रास (Gemini Zodiac)


बुध ग्रहाचं गोचर या राशीच्या लोकांसाठी अशुभ ठरणार आहे. तुमच्या राशीतून सहाव्या घरात जाणार आहे. त्यामुळे यावेळी शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात. त्यामुळे तुमच्यावर कर्जाचं बोझं वाढणार आहे. नोकरदार लोकांवर कामाच्या ठिकाणी खूप जास्त कामाचा ताण वाढणार आहे. या कामाच्या तणावामुळे तुमचं कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार आहे. या काळात आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. नोकरीच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या. 



मीन रास (Pisces Zodiac)


बुध गोचर तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. तु्म्ही या काळात कितीही मेहनत केली नाही तरी तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. होणारी कामंही अडथळे निर्माण होणार आहे. तुमच्या स्वभावात या काळात चिडचिडा होणार आहे. या काळात तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती खालावणार आहे. करिअर आणि व्यवसायात कोणतेही बदल करण्याचा विचार करत असाल काही काळासाठी तो करु नका. नवीन गुंतवणूक करणे टाळा. तुमच्यावर काही खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्यावर तणाव वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला दुर्मिळ कलात्मक राजयोग! 'या' राशींना मिळणार कुबेराचा खजिना



(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)