Shani Vakri 2024: प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी काही ग्रह वक्री आणि मार्गस्थ देखील होतात. असंच कर्म देणारा शनिदेव 29 जून 2024 रोजी मूळ त्रिकोण कुंभ राशीत वक्री झाला आहे. 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत शनी उल्टी चाल चालणार आहे. दरम्यान शनीच्या या हालचालीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आय़ुष्यात अचानक वादळ येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.


वृषभ रास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लोकांसाठी शनीची उलटी हालचाल नकारात्मक परिणाम देऊ शकते. संयमाने वेळ काढलात तर तुमचे नुकसान टाळता येईल. तुमचे शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होऊ शकते. 


मिथुन रास


शनीच्या वक्री स्थितीमुळे जीवनात अनेक बदल होतील. यापैकी काही असे असतील जे तुम्हाला समस्या देऊ शकतात. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला मित्रांकडूनही त्रास होऊ शकतो. ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढू शकतो.


कर्क रास


या काळात तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा अन्यथा तुमचे करिअर खराब होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी धोरणात्मक पद्धतीने पुढे जावे. आर्थिक बाबतीत जोखीम घेऊ नका. तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. वैवाहिक जीवनातही तुमचा तणाव वाढू शकतो. या काळात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


वृश्चिक रास


हा काळ तुमच्या व्यावसायिक जीवनासाठी चांगला म्हणता येणार नाही. तुमचे मन एकाग्र राहणार नाही. वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला अभ्यासात आणि कामात अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही प्रकारच्या मानसिक छळातून जावं लागण्याची शक्यता आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )