Rakshabandhan| भद्रा काळात चुकूनही भावाला बांधून नका राखी; जाणून घ्या कारण
Rakshabandhan| भद्रा काळात भावाच्या मनगटावर राखी बांधणं अशुभ मानलं जातं.
Rakshabandhan: भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याच्या उत्सव म्हणजेच रक्षाबंधन होय. या दिवशी बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात. परंतू राखी बांधण्यासाठी भद्रा काळ योग्य नाही. भद्रा काळात शुभ काम केलं जात नाही.
भद्रा कोण आहे?
भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. शास्त्राचे विद्वान सांगतात की, भद्राला शनिदेवासारखेच सारखेच स्थान आहे आणि नातेसंबंधात ती शनिदेवाची बहीण आहे. म्हणजेच भद्रा ही सूर्याची कन्या आहे. भद्राची स्थिती पंचांगाने मोजली जाते.
शूर्पनखाने रावणाला भद्रा काळात बांधली राखी
रावणाचं राज्य अत्यंत समृद्ध होते. रावण श्रीमंत होता. शूर्पनखा रावणाची बहिण होती. तिने भद्रा काळात लंकापती रावणाला राखी बांधली होती. त्यानंतर त्याच्या सत्तेचा ऱ्हास सुरू झाला होता.
भद्रा काळाचा प्रभाव कधी असतो?
ऐस्ट्रोलोजर्सचे म्हणणे आहे की, भद्रा तिन्ही लोकमध्ये फिरत असते. परंतू जेव्हा ती मृत्यूलोकांत असते तेव्हा सर्व शुभ कामं थांबवली पाहिजे. कारण ही वेळ शुभ कामात अडचणी निर्माण करते.
या वेळचा योग कधी?
या वर्षी रक्षाबंधन 11 ऑगस्ट गुरूवारी आहे. तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, यंदा भद्रा काळ वेगैरे तर नाही ना.. किंवा असेल तर कधी आहे. तर ज्योतिष म्हणतात की, यावेळी भद्राची सावली पाताळलोकावर पडणार आहे. त्यामुळे पृथ्वीवर भद्राचा कोणताही प्रभाव नसेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)