Bhadra Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 ग्रहांपैकी बुध, शुक्र, मंगळ, शनी ही महत्त्वाची ग्रह आहेत. यातील ग्रहांचा राजकुमार बुध ( Mercury transi) ग्रह या राशीच्या परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. बुध ग्रह हा वाणी, गणित, शिक्षण, व्यवसाय आणि बुद्धिमत्तेचा कारक आहे. नुकतेच बुध स्वराशी मिथुन राशीत प्रवेश केल्यामुळे अतिशय शुभ राजयोग जुळून आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 50 वर्षांनंतर असा योगायोग तयार झाला आहे. बुध परिवर्तनामुळे भद्र राजयोग जो महापुरुष राजयोगा एवढ्या शुभ मानला जातो. भद्रा राजयोग हा तीन राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीतील पहिल्या, चौथ्या, सातव्या आणि दहाव्या घरात बुध ग्रह मिथुन (budh gochar ) किंवा कन्या राशीत असतो तेव्हा भद्र राजयोग तयार होत असतो. त्याशिवाय जेव्हा  कुंडलीत सूर्य आणि बुध एकमेकांना भेटतात तेव्हा बुधादित्य योग जुळून येतो. (Bhadra rajyog formed due to mercury sun after 50 years 3 zodiac signs money benefits  budh gochar )


मिथुन (Gemini)


बुध संक्रमणामुळे तयार झालेला भद्रा राजयोगाचा सर्वाधिक फायदा मिथुन राशीच्या लोकांना होणार आहे. करिअरमध्ये यशाची पायरी चढणार आहेत. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या मालामाल होणार आहेत. माध्यम, लेखन किंवा कला क्षेत्राशी संबंधित लोक यांना यश प्राप्त होणार आहे. नवीन ओळखी भविष्यात फायदाची ठरणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. प्रत्येक कामात यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. बाहेर जाण्याचा योग जुळून आला आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. 


धनु (Sagittarius)


भद्रा राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी नशिब पालटणारा ठरणार आहे. व्यावसायिकांसाठी सर्वाधिक लाभदायक हा काळ असणार आहे. नवीन प्रकल्प आणि करार होणार आहेत. अविवाहितांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Shani Mahadasha : 2 वर्षे 6 महिन्यांची शनी महादशा देईल बक्कळ पैसा, कधी येणार हा सुखद काळ?


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)