Bhadra Yoga Benefits: ज्योतिष शास्त्रामध्ये कुंडली पाहून एखाद्या व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज बांधता येतो. अगदी अशाचप्रकारे एखाद्या व्यक्तीच्या हातावरील रेषा म्हणजेच हस्तरेषा (hand palmistry) त्या व्यक्तीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतात. हस्तरेषांचंही एक शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये हातावरील रेषा आणि चिन्हांच्या आधारे एखाद्या व्यक्तीची भविष्यवाणी करता येतो. हस्तरेषा शास्त्रानुसार, हातावर काही अशा खास रेषा आणि चिन्हं असतात ज्यामुळे व्यक्ती भाग्यवान असल्याचं मानलं जातं. हातावरील या रेषाच व्यक्तीचं आयुष्य आणि भविष्य कसं असेल यासंदर्भातील स्पष्ट संकेत देतात असं हे हस्तरेषा शास्त्र सांगतं. या लेखामध्ये आपण भद्र योगाबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या नशिबात हा योग असतो त्याला कोट्याधीश होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही असं मानलं जातं.


भद्र योग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेव्हा हातावर बुध पर्वत पूर्णप्रकारे विकसित असेल आणि बुध रेषा सरळ, नाजूक, गडद असेल तर त्या व्यक्तीच्या नशिबात भद्र योग असतो असं म्हटलं जातं. असे लोक अब्जाधीश असतात. हे लोक मोठे उद्योजक असतात किंवा भविष्यात ते उद्योजक होण्याची शक्यता असते.


शश योग


ज्या लोकांच्या हातावर शश योग असतो ते उद्योगपती होतात किंवा असतात. या लोकांना साहस आवडतं. हे लोक फार लवकर एखाद्या व्यक्तीला मित्र बनवू शकतात. या लोकांनी बुध ग्रहासंबंधित व्यापार केल्यास तो त्यांना फायदेशीर ठरतो असं मानलं जातं.


माशाचं चिन्ह


ज्या लोकांच्या हातावर बुध पर्वतावर माशाचं चिन्ह असतं ते लोक उद्योगपती म्हणून फार यश मिळवतात. या लोकांवर लक्ष्मीमातेचा वरदहस्त असतो. असे लोक खर्च करताना हातचं राखून ठेवत नाही. हे लोक मनमोकळेपणे पैसे खर्च करतात. असा लोकांचा लक्झरी लाइफ जगण्याकडे कल असतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)