Bhadrapad Amavasya 2023 : आज पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा! जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व
Pithori Amavasya And Bail Pola 2023 : पिठोरी अमावस्या ही भाद्रपद महिन्यातील श्रावणात येते. त्याच दिवशी महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला जातो. जाणून घ्या पूजा पद्धत, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या.
Pithori Amavasya And Bail Pola 2023 : पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं. आज भाद्रपद महिन्यातील श्रावण कृष्ण पक्षातील पिठोरी किंवा दर्श अमावस्या आहे. पिठोरी अमावस्याला भाद्रपद अमावस्या असंही म्हणतात. पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैल पोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायचं आगमन होतं. (Bhadrapad Amavasya 2023 and Pithori Amavasya and Bail Pola 2023 tithi date puja vidhi and importance in marathi)
बळीराजाचा लाडका बैल तो शेतात अहोरात्र राबत असतो तेव्हा त्याला धान्य पिकवण्यास मदत होते. त्यामुळे बैलाप्रती कृतज्ञता आणि प्रेम, आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात बैल पोळा हा सण साजरा केला जातो. विदर्भात बैल पोळाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 सप्टेंबरला तान्हा पोळा साजरा करण्याची प्रथा आहे. लहान मुलं लाडकीच्या बैलाला सजवून दारोदारो आपले बैल घेऊन जातात. यादिवशी अनेक ठिकाणी लहान मुलांना आणि बैला सजविण्याची स्पर्धा आयोजित केली जाते.
अमावस्या तिथी
पंचांगानुसार भाद्रपद महिन्याची अमावस्या तिथी 14 सप्टेंबर 2023 ला पहाटे 4 वाजून 48 मिनिटांपासून सुरू झाली आहे. तर 15 सप्टेंबर 2023 ला सकाळी 7 वाजून 9 मिनिटापर्यंत असणार आहे.
पिठोरी अमावस्या पूजाविधी
या अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, त्यामुळेच याला पिठोरी अमावस्या असं म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमावस्येला उपवास करतात. ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो. याशिवाय अमावस्येला पितृदोषापासून मुक्तीसाठी उपाय केले जातात.
हेसुद्धा वाचा - Bhadrapad Amavasya 2023 : पिठोरी अमावस्येला अद्भुत संयोग! 4 राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार
बैलपोळा सण असा साजरा करा
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पोळा हा सण मोठ्या उत्साहात केला जातो. सकाळी उठून घरातील बैलांना नदीवर नेऊन त्यांना उटणे लावून त्यांची आंघोळ घालून विविध वस्त्रांनी आणि दागिन्यांनी सजवलं जातं. घरातील स्त्री त्या बैलांची पूजा करतात आणि पुरणपोळीच्या नैवेद्य बैलांना दिला जातो. ज्या घरात बैल नसतात ते लोक मातीचे बैल बनवतात आणि त्याची पूजा करुन कृतज्ञता व्यक्त करतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)