Bhai Dooj 2022 : प्रकाशमय असलेल्या या दिवाळीच्या सणात एक दिवस भाऊबीजेचा असतो. हा दिवस बहिण-भावाच्या प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. दिवाळीचा हा पाचवा दिवस (Bhaubeej 2022)असतो. या दिवशी बहीण भावाला औक्षण करून त्याच्या सुखी, समृद्धी आणि दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कार्तिक शुद्ध द्वितीयेला भाऊबीज साजरी (Bhai Dooj 2022 Shubh Muhurt) केली जाते. या दिवसाला यमद्वितीयाही म्हटलं जातं. या दिवशी यम आपली बहीण यमुनाच्या घरी जेवायला गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळालं. मात्र, भाऊबीज नक्की कधी आहे? (bhai dooj 2022 date) 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबरला? असा सवाल अनेकांच्या मनात आहे. त्याचबरोबर (bhai dooj 2022 date and time) शुभ मुहुर्त किती वाजता? असा प्रश्न देखील विचारला जातोय.


भाऊबीज नेमकी कधी? 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर?


कार्तिक शुद्ध द्वितीयेची तिथी बुधवारी 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:43 वाजता सुरू होईल आणि गुरुवार, 27 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:45 वाजता समाप्त होणार आहे. जर 26 ऑक्टोबरला भाऊबीजचा (Bhai Dooj) सण साजरा करणार असाल तर दुसरी तिथी सुरू झाल्यानंतर म्हणजेच दुपारी 03.33 पर्यंत पूजा आणि भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आहे.


आणखी वाचा - Diwali Bhau Beej 2022 : भाऊरायास दीर्घआयुष्य मिळावं म्हणून अशी करा पूजा


दरम्यान, 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 01:57 ते 02:42 पर्यंत विजय मुहूर्त असणार आहे. जे 27 ऑक्टोबर रोजी भाऊबीजचा सण साजरा करणार आहेत, त्यांना सकाळी 11.07 ते दुपारी 12.45 या वेळेत भाऊबीज साजरा करता येणार आहे. याशिवाय अभिजीत मुहूर्त सकाळी 11.42 ते दुपारी 12.27 पर्यंत राहील. यामध्ये भाऊबीज साजरी करणं शुभ मानलं जातं.