तुमची `ही` रास असेल तर, पायात काळ धागा घालण टाळा
कोणत्या राशीच्या लोकांनी पायात काळा धागा बांधणं अशुभ ... जाणून घ्या
मुंबई : अनेक व्यक्ती पायात काळा धागा घालतात. काही व्यक्ती तर पायत लॉकेटसोबत काळा धागा घालतात. पायात काळा धागा घातल्यामुळे वाईट नजरेपासून आपण दूर राहतो. पण सर्व राशींसाठी काळा धागा लाभदायक नसतो. काही राशींच्या व्यक्तींसाठी काळा धागा शुभ असतो, तर काही व्यक्तींसाठी अशुभ.
अशा स्थितीत ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांनी काळा धागा घालू नये. आज जाणून घेवू... 2 राशीच्या व्यक्तींनी कधीही काळा धागा घालू नये...
मेष (Aries): या राशीचा स्वामी मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रहाला काळ्या रंगाची घृणा आहे. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालणे टाळावे. असे मानले जाते की मेष राशीच्या लोकांनी जर काळ्या रंगाचा धागा वापरला तर काहीतरी वाईट होऊ शकते.
वृश्चिक (Scorpio): मंगळ हा वृश्चिक राशीचा अधिपती आहे. मंगल देव यांना काळ्या रंगाचा तीव्र तिरस्कार आहे. याच कारणामुळे या राशीच्या लोकांसाठी काळा रंग खूप अशुभ सिद्ध होतो. अशा स्थितीत या राशीच्या व्यक्तीने काळा धागा घालू नये.
काळा धागा कोणत्या राशीसाठी शुभ?
ज्योतिष शास्त्रानुसार तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा अत्यंत शुभ आहे. या राशीच्या व्यक्तींसाठी काळा धागा वरदान म्हणून सिद्ध होतो. शिवाय करियरला देखील नवी कलाटनी मिळते.
(वरील माहिती सर्वसामान्य समजुतींवर आधारित आहे, झी 24 तास याची खातरजमा करत नाही)