Black Thread : `या` राशींच्या व्यक्तींनी चुकूनंही घालू नये काळा धागा; फायद्यापेक्षा होईल नुकसान
Black Thread Effect on Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रामध्ये काळ्या धाग्याला फार महत्त्व आहे. प्रत्येकाने हा धागा वापरला पाहिजे का? ज्योतिष शास्त्राप्रमाणे, काही राशींच्या व्यक्तींना हा काळा धागा वापरण्याचा सल्ला दिला जात नाही.
Black Thread Effect on Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रामध्ये ( Astrology ) काळा धागा ( Black Thread ) हा खूप महत्त्वाचा मानला जातो. असं मानलं जातं की, पायात काळा धागा असेल तर आपल्याला कोणाचाही वाईट नजर लागू शकत नाही. इतकंच नाही तर वाईट शक्तींपासून दूर ठेवण्यासंही हा काळा धागा तुम्हाला मदत करतो. तुमच्या पायात देखील हा धागा असू शकतो. मात्र प्रत्येकाने हा धागा वापरणं योग्य आहे का? ज्योतिष शास्त्रामध्ये याबाबत माहिती दिलेली आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, अशा काही राशी आहेत, ज्यांना हा काळा धागा ( Black Thread ) न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. या राशींना जर काळा धागा परिधान केला तर यामुळे त्यांचा फायदा नव्हे तर नुकसान होताना दिसतं. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास
मंगळ हा मेष राशीचा स्वामी असून त्याचा रंग लाल आहे. असं मानलं जातं की, मंगळ ग्रहाला काळा रंग आवडत नाही. त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींनी हात, पाय किंवा गळ्यात काळा धागा बांधू नये. जर या राशींच्या व्यक्तींच्या हाता किंवा पायात काळा धागा असेल तर विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय या लोकांनी काळा धागा परिधान केल्यास नकारात्मक उर्जा मागे लागते. जर तुम्हाला काळा धागा वापरायचाच असेल तर तज्ज्ञांची मदत अवश्य घ्यावी.
वृश्चिक रास
ज्योतिष शास्त्राप्रमाणे, वृश्चिक राशीच्या लोकांचे नेतृत्व मंगळ ग्रह असतो. त्यामुळे जर या व्यक्तींना काळा धागा परिधान केला तर त्यांच्या आयुष्यात अडचणी येण्याची शक्यता असते. या व्यक्तींच्या जीवनात दुर्दैव, नकारात्मक ऊर्जा, आजारपण, गोंधळ, व्यवसायात अडचणी येऊ लागतात. या राशींच्या व्यक्तींच्या हाता पायात जर काळा धागा असते तर तो जीवनात नकारात्मक परिणाम देऊ शकतो.
धनु रास
धनु राशीचा स्वामी बृहस्पति असल्याने या राशीच्या लोकांनाही काळा धागा वापरू नये. असं मानलं जातं की, काळ्या रंगामुळे तुमच्या कामात अडचणी येऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्ही काळा धागा घातला असेल तर तो घालण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. याशिवाय जर तुम्हाला धागा वापरायचाच असेल तर पिवळ्या रंगाचा वापर तुम्ही करू शकता.