Budh Rashi Parivartan :  हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांचा प्रत्येक राशींच्या व्यक्तीवर प्रभाव होतं असतो. तुमच्या कुंडलीतील ग्रह कुठल्या घरात आहे यावर तुमचं भाग्य ठरतं. तसंच जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. त्यावरील त्याचा परिणाम चांगला किंवा वाईट या त्या त्या राशींच्या व्यक्तीच्या आयुष्यात होतो. 7 फेब्रुवारी 2023 ला बुध धनु राशी सोडून शनीच्या मकर राशीत प्रवेश करेल.  ज्योतिषशास्त्रात बुध हा तर्क, बुद्धिमत्ता, संवादाचा ग्रह मानला जातो. त्यामुळे या ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींचे बंद भाग्य उघडेल. धन आणि लाभाचे योगही निर्माण होती. नोकरीत बढती आणि व्यवसायात वाढ झाल्याने आर्थिक लाभ होणार आहे. तर काही राशींना तर बंपर लाभ होणार आहे. (Budh Gochar 2023 Effect on these zodiac signs become rich Mercury Transit in Capricorn 07 February 2023 horoscope today marathi news)


बुध संक्रमण 2023 कधी ? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार बुध ग्रह 7 फेब्रुवारीला सकाळी 7.38 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर बुध हा  7 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 27 फेब्रुवारीला दुपारी 04.55 वाजता बुध शनीच्या दुसऱ्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 



मेष (Aries)


बुधाचं संक्रमणामुळे मेष राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. या काळात या राशीचे लोकांचे निर्णयाचे खूप कौतुक होणार आहे. शत्रूवर या काळात तुम्ही वर्चस्व गाजवाल. 


वृषभ (Taurus)


तर वृषभ राशीच्या लोकांच्या करिअरवर अनुकूल प्रभाव पडेल आणि जीवन आनंदी राहील. मेहनतीचं फळ मिळेल. 


मिथुन  (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात या काळात भरपूर आनंद असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात काही चांगले बदल होण्याची शक्यता आहे. यासोबतच जीवनात शांतता नांदेल.


कन्या  (Virgo)


 


हेसुद्धा वाचा - Surya Saptami 2023 : आज सूर्य सप्तमी म्हणजेच Ratha Saptami, जाणून घ्या पूजा विधी आणि मंत्र


 


 कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या समस्यांचं निरासन होईल. या राशीच्या लोकांचं लव्ह लाइफ किंवा वैवाहिक जीवनात आनंदच आनंद असणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


 वृश्चिक राशीच्या लोक या काळात उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होणार आहे. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मात्र जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, ती काळजीपूर्वक करा. 



धनु (Sagittarius)


या राशीसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. त्यांना त्यांचा मेहनतीचं फळ मिळणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. 


मकर (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठीही हा काळा आर्थिक फायदा घेऊन आला आहे.  मकर राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि उत्पन्न वाढल्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. 


मीन (Pisces)


हे संक्रमण मीन राशीच्या लोकांच्या करिअरसाठी खूप चांगले सिद्ध होणार आहे. त्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. याशिवाय व्यावसायिकांनाही फायदा होऊ शकतो आणि जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असेल तर त्यात यश मिळणार आहे. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)