Budh Gochar 2022: ज्योतिषशास्त्र ग्रहांच्या स्थितीवर मांडलं जातं. कोणता ग्रह कोणत्या स्थितीत आहे त्यावर अनुमान काढला जातो. ठरावीक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपली राशी बदल करत असतो. त्याचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व राशींवर होत असतो. डिसेंबर महिन्यात काही ग्रह आपली राशी बदल करणार आहेत. 3 डिसेंबरला बुध ग्रह धनु राशीत प्रवेश (Budh Grah Gochar) करणार आहे. या गोचरामुळे भद्र राजयोग (Bhadra Rajyog) तयार होणार आहे. या राजयोगाचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या राशीवर सकारात्मक परिणाम होणार ते...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिथुन (Mithun)- ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाच्या गोचरामुळे मिथुन राशीच्या लोकांना शुभ फळ मिळणार आहे. बुध गोचर धनु राशीच्या सप्तम स्थानात होणार आहे. हे स्थान वैवाहिक जीवन आणि भागीदारीशी निगडीत आहे. या स्थानात एखादा ग्रह चांगल्या स्थितीत असेल तर जोडीदार आणि भागीदार चांगला मिळतो. यामुळे हा काळ मिथुन राशींसाठी चांगला असणार आहे. लग्नासाठीही शुभ काळ आहे.


वृषभ (Vrushabh)- या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. या राशीच्या लोकांच्या आठव्या घरात हा राजयोग तयार होणार आहे. या स्थानावरून वय आणि गुप्त रोगांचे मानले जाते. या काळात जुनाट आजारापासून मुक्तता होऊ शकता. संशोधनाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ राहील. दुसरीकडे, जर तुम्ही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अनुकूल आहे. या काळात व्यवसायाचा विस्तारही करता येईल.


बातमी वाचा- Mahashivratri 2023: पुढच्या वर्षी महाशिवरात्री कधी? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पारण वेळ


मीन (Meen)- ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीसाठी भद्र राजयोग लाभदायी ठरेल. बुध ग्रह या राशीच्या दशम स्थानात गोचर करणार आहे. नोकरी आणि कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल. नव्या नोकरीचा प्रस्ताव मिळू शकतो. उद्योगपतींसाठी हा काळ अनुकूळ असणार आहे. धनलाभासोबत उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच नशिबाची साथ देखील मिळेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)