Budh Gochar In Kanya : ज्योतिषशास्त्रामध्ये, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपल्या राशीमध्ये बदल करतात. बुध हा सर्वात लहान ग्रह मानला जातो. चंद्रानंतर, बुध ग्रह एका राशीतून दुस-या राशीत सर्वात जलद गतीने संक्रमण करतो. आगामी काळात बुध ग्रह ( Budh Gochar ) त्याच्या राशीमध्ये बदल करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुध ग्रह 1 ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या ( Budh Gochar ) गोचरचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर बुधाच्या गोचरचा चांगला परिणाम दिसून येणार आहे. जाणून घेऊया एक ऑक्टोबरपासून कोणत्या राशींचं नशीब उजळणार आहे. 


कन्या रास 


बुधाचा राशी बदल या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. त्याचप्रमाणे जे व्यावसायिक आहेत त्यांच्या व्यवसायात वाढ होण्याची चिन्हे आहेत. नोकरदार लोकांना या करिअरमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. या काळात रखडलेल्या कामात यश मिळेल. तुमच्या कुटुंबात सुसंवाद वाढण्याची शक्यता आहे.


वृषभ रास ( Taurus Zodiac )


बुधाचं गोचर ( Budh Gochar ) तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणारे विद्यार्थी विजयी होऊ शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून अपघाती पैसेही मिळू शकतात. शेअर मार्केट, सट्टेबाजी आणि लॉटरीमध्ये नफा होऊ शकतो. या लोकांच्या जीवनात सुख-सुविधा वाढणार आहेत.


मकर रास


बुधाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तसेच तुम्ही प्रवासाला जाऊ शकता. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. यासोबतच कर्जबाजारी लोकांना कर्जमुक्ती मिळेल. या कालावधीत विद्यार्थी परदेशात शिक्षण घेऊ शकतात. त्याचबरोबर कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )