Mesh Trigrahi Yog : बुध गोचर काही राशींच्या लोकांच्या अडचणीत वाढवणार आहेत. 31 मार्च 2023 रोजी बुध ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीतील बुध, शुक्र आणि राहूच्या या संयोगामुळे त्रिग्रही योग तयार होईल, ज्यामुळे काही लोकांच्या अडचणी वाढू शकतात. बुधाच्या गोचरमुळे मेष राशीमध्ये बुध, शुक्र आणि राहूचा संयोग होईल कारण राहू आणि शुक्र मेष राशीमध्ये आधीपासूनच आहेत. अशा प्रकारे, मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होईल, ज्याचा सर्व राशींच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. दुसरीकडे, हा योग काही राशींसाठी खूप अडचणी निर्माण करु शकतो. जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांना 31 मार्चपासून काळजी घ्यावी लागेल. 


बुध गोचरमुळे या राशींच्या लोकांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : या राशींच्या लोकांना उद्यापासून अर्थात 31 मार्चपासून विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग चांगला असणार नाही. आर्थिक गणित बिघडू शकते. या लोकांच्या हाती पैसे येतील तसेच ते मोठ्या प्रमाणात खर्चही करावे लागलतील. त्यामुळे तुमचे खर्चाचे बजेट बिघडू शकते. कौटुंबिक नात्यात फसवणूक होऊ शकते किंवा मित्र किंवा जोडीदार फसवणूक करु शकता. त्यामुळे तुम्ही काळजी घेण्याची गरज आहे. गुंतवणूक करताना काळजी घ्या. नुकसान होण्याचा धोका असल्याने गुंतवणूक करणे योग्य नाही. विशेषतः जोखमीची गुंतवणूक अजिबात करु नका. वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. कारण वादामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल.


कन्या : बुध गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चिंता करणारा आहे. कारण तुम्हाला मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. या योगाचा या राशींच्या लोकांच्या जीवनावर तसेच आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नवीन काम हाती घेण्याची शक्यतो टाळावे. त्यामुळे तुमची गूंतवणूक होणार नाही आणि होणारे नुकसान टळू शकते. जर गूंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नुकसान होऊ शकते. वाहन चालवताना काळजी घ्या. अपघाताचा धोका आहे.


वृश्चिक : या योगामुळे या राशींच्या जीवनात बुध गोचरमुळे अडचणींचा सामना करावा लागणार आहे. राहू, बुध आणि शुक्र यांच्या एकत्रित येण्याने तयार होणारा त्रिग्रही योग वृश्चिक राशीच्या लोकांना मोठे नुकसान पोहोचवू शकतो. कोर्टात सुरु असलेल्या खटल्यांमध्ये या लोकांना पराभवाला सामोरे जावे लागू शकते. आर्थिक स्थितीतही चढ-उतार असतील. सावधगिरी बाळगली नाही तर कर्जाचा बोजा वाढू शकतो. तसेच कौटुंबीक नात्यातही अडचणी येऊ शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)