मुंबई : बुध ग्रह आपली चाल बदलत आहे. त्याचा प्रभाव इतर राशींवर होणार आहे. 3 जूनपासून 5 राशींचं करिअर उजळणार आहे. आर्थिक फायदा, कुटुंबातील वातावरण आणि नात्यांमध्येही चांगलं वातावरण राहणार आहे. 3 जूनपासून पुढचा काही काळ त्यांच्यासाठी आनंदाचा असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष : या राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे. त्यांना सोन्याचे दिवस येऊ शकतात, मोठे यश मिळेल. जुनी प्रकरणे निकाली निघतील. हातात पुरेसा पैसा असल्यास जीवन सोपे होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील.


वृषभ : या राशीच्या लोकांसाठी शुभ काळ असणार आहे. कामात एकामागून एक झपाट्याने यश मिळेल. काही मोठे करार होतील. तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. स्पर्धा परीक्षेत बसलेल्यांना यश मिळेल. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे.


सिंह : या राशीच्या लोकांसाठी भाग्योदय होणार आहे. कारकिर्दीत मोठे यश मिळेल. बढती-वाढ किंवा नवीन नोकरी मिळू शकते. लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील.


तुळ : कामात मोठं यश मिळेल. जे प्रमोशन होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलू इच्छिणाऱ्या लोकांची इच्छाही या महिन्यात पूर्ण होईल. गुंतवणूकदारांना फायदा होईल. उत्पन्न वाढेल.


वृश्चिक : या राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. करिअरमध्ये मोठा फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. या राशीच्या व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला राहील. 


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक माहिती आहे बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )