Budh Uday 2023 : आज `या` लोकांचं भाग्य चमकणार! बुध उदयमुळे कुबेरचा खजिना लागणार हाती
Budh Uday in kark 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध 8 जुलैला कर्क राशीत प्रवेश (budh gochar 2023) केला आहे. आज बुध ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे काही लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे.
Budh Uday 2023 : प्रत्येक ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपली स्थिती बदल असतो. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह 8 जुलैला कर्क राशीत (mercury transit in cancer) विराजमान झाला आहे. बुध ग्रह हा धन, बुद्धिमत्ता, व्यापार, तर्क, संवाद आणि वाणीचा कारक मानला जातो. त्यामुळे ज्या जाचकाच्या कुंडलीत बुधाची स्थिती उत्तम आणि मजबूत असते. त्या जाचकावर माता लक्ष्मीची कृपा असते असं म्हणतात.
कर्क राशीत प्रवेश केल्या नंतर बुध ग्रह आता उदय स्थितीत येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम सर्व 12 राशींवर पडणार आहे. काहींसाठी बुध उदय हा सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक परिणाम घेऊन आला आहे. पण बुध उदयमुळे काही राशींच्या लोकांचं भाग्यात आज कुबेराचा खजिना लाभणार आहे. चला तर जाणून घेऊयात तुमच्या राशीवर काय परिणाम होणार ते...(budh uday 2023 in kark today 11 july 3 zodiacs signs give money)
मिथुन (Gemini)
ग्रहांचा राजकुमार बुधाच्या उदयामुळे मिथुन राशीच्या लोकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. या लोकांवरील आर्थिक संकट दूर होणार आहे. या लोकांना अनेक मार्गाने धनप्राप्त होईल. अडकलेले पैसे सहज तुम्हाला परत मिळणार आहेत. त्यामुळे तुमचं बँक बलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. आर्थिक संकट दूर झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वासात वाढ होणार आहे. मालमत्ता किंवा गाडी, घर खरेदी करण्याचे योगही तुमच्या कुंडलीत जुळून आले आहेत. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळणार आहे. प्रमोशनसोबतच बदलीची शक्यता आहे.
कन्या (Virgo)
बुध उदयामुळे कन्या राशीच्या लोकांना अनेक लाभ होणार आहे. कामाच्या ठिकाणी तिचं कौतुक होणार असून प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा व्याप वाढणार आहे. व्यवयायिकांसाठीही हा काळ चांगला असणार आहे. त्यांचं व्यवसायचा आराखडा वाढणार आहे. नफा वाढल्यामुळे उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मानही या दिवसांमध्ये वाढणार आहे.
हेसुद्धा वाचा - Somvati Amavasya 2023 : कधी आहे सोमवती अमावस्या? त्या दिवशी घडतात 3 दुर्मिळ शुभ संयोग
मकर (Capricorn)
बुध उदय मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं त्यांना मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन आणि पगार वाढ होणार आहे. तुमचे कुठे पैसे अडकलेले असतील तर ते तुम्हाला आता परत मिळणार आहेत. तुमच्यासोबत तुमच्या जोडीदाराची प्रगती होणार आहे. वडिलोपार्जित व्यवसायातून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कोर्टाचे निकाल तुमच्या बाजूने लागणार आहे. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी वाढणार आहे.