Budh Uday 2023 : दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे देव दिवाळी म्हणजे कार्तिक पौर्णिमा असतो. देव दिवाळीला सर्व देव पृथ्वीतलावर येतात. यंदाचा देव दिवाळी, कार्तिक पौर्णिमा काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह उदय होणार आहे. बुध हा बुद्धिमता, संवाद आणि निर्णय क्षमतेचा कारक मानला जातो. कार्तिक पौर्णिमा ही 27 नोव्हेंबरला असणार आहे. या दिवशी बुध वृश्चिक राशीतून धनु राशीत उदय स्थितीत येणार आहे. बुध उदय काही राशींसाठी धनलाभ घेऊन येणार आहे. (Budh Uday 2023 Mercury the prince of planets will make you rich Kartik Purnima will be auspicious for these zodiac signs)


'ही' लोक होणार श्रीमंत?


कन्या रास (Virgo Zodiac) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रहांचा राजकुमार बुध कन्या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. बुध उदयमुळे तुमचं अडकलेली कामं मार्गी लागणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार असून त्यासोबत कामात मोठं यश प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढणार आहे. व्यवसायात चांगला नफा मिळणार आहे. या लोकांना मनासारखा जोडीदार आयुष्यात येणार आहे. 


धनु रास (Sagittarius Zodiac)


ग्रहांचा राजकुमार बुध या राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या लोकांच्या जीवनात आनंद एन्ट्री मारणार आहे. समाजात तुमच्या मान-सन्मान वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला लाभ होणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ होणार आहे. राजकारणांशी संबंधित लोकांसाठी बुध उदय लाभदायक ठरणार आहे. 


कुंभ रास (Aquarius Zodiac) 


ग्रहांचा राजकुमार या राशीच्या लोकांसाठी नशिबाची साथ घेऊन येणार आहे. तुमच्या आयुष्यात आनंद, यश आणि धनलाभ घेऊन आला आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग लाभणार असून तुमचं बँक बॅलेन्समध्ये वाढ होणार आहे. अडकलेला पैसा तुम्हाला परत मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठीही बुध उदय चांगला ठरणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Tulsi Vivah Rajyog : यंदा तुळशी विवाह ठरणार शुभ! 4 राजयोग 'या' राशींवर करणार धनवर्षाव


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)