Budh Uday 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतात. पंचांग आपल्याला शुभ अशुभ वेळेसोबतच नक्षत्र, तिथी आणि राशी परिवर्तन सांगत असतं. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आता काही राशींच्या लोकांचं नशिब पालटणार आहे. अपार धनसंपदा मिळणार आहे. बुधाला ग्रहाचा राजकुमार असं म्हटलं जातं. संपत्ती, सौंदर्य, वैभव यांचं बुध हे प्रतिक आहे. वैदिक शास्त्रानुसार लवकरच बुध ग्रह उगवतो आहे त्यामुळे काही राशींच्या भाग्याचे नशीबही उघडणार आहे. 


कधी आहे बुध उदय ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनुसार बुध उदय हा 14 मे 2023 ला होणार आहे. बुध ग्रह सध्या मेष राशीत आहे. तो 14 मेनंतर उदय होईल. खरं तर ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्याही ग्रहाची अस्त ही चांगली मानली जात नाही. ग्रहाच्या अस्तामुळे त्याचा प्रभाव कमी झाल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होतो. पण कधी कधी सेट ग्रह देखील राशींना शुभ सिद्ध होतो. (budh uday 2023 millionaires to 3 zodiac signs money and profit with love life )


मेष (Aries)


बुध उदय या राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांचे आत्मविश्वास वाढणार आहे. चंद्रप्रमाणे या लोकांचे व्यक्तिमत्व समाजात चमकणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहणार आहे. हा काळ व्यावसायिंकासाठी सर्वाधिक लाभदायक ठरणार आहे. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. 


कर्क (Cancer)


या राशीच्या लोकांसाठी बुध उदय शुभदायक ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. पगार वाढ आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना धनलाभ होणार आहे. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आणि अ़डकलेले पैसे मिळणार आहेत. बाहेर गावी जावं लागू शकतं. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांना बुध उदयाचा सर्वाधिक फायदा होणार आहे. या लोकांना नशिबाची जबरदस्त साथ मिळणार आहे. अचानक आर्थिक फायदा होणार आहे. अनेक वेळापासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिकलाभ होणार आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. सहलीवर जाण्याचा बेत आखणार आहात. 


हेसुद्धा वाचा - Apara Ekadashi 2023 : कधी आहे अपरा एकादशी? अमाप समृद्धी देणाऱ्या या व्रताचे विशेष महत्त्व जाणून घ्या


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)