Budh Uday: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. यावेळी काही ग्रह हे उदय आणि अस्त देखील होतात. सर्व ग्रहांमध्ये बुध हा सर्वात लहान ग्रह असून त्याला ग्रहांचा राजकुमार म्हटलं जातं. मिथुन आणि कन्या या राशींवर बुधाचं वर्चस्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान ज्यावेळी बुध ग्रहाच्या हालचालीत बदल होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होताना दिसतो. 13 सप्टेंबर रोजी बुध ग्रहाचा सिंह राशीमध्ये उदय झाला आहे. दरम्यान बुधाच्या उदयचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होताना दिसतोय. मात्र यावेळी 3 राशी अशा ज्यांना बुध ग्रहाच्या उदयामुळे विशेष लाभ होणार आहेत.


वृषभ रास (Taurus Zodiac)


बुधाचा उदय या राशींच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. या काळात तुम्ही प्रगती करू शकता. तसंच तुम्हाला भौतिक सुख मिळू शकणार आहे. तुम्हाला मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळू शकणार आहे. प्रत्येक कामामध्ये तुमच्या आईचेही सहकार्य मिळेल. पती-पत्नीचे नाते घट्ट होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये सुवर्ण संधी मिळतील. 


कर्क रास (Cancer Zodiac)


कर्क राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय अनुकूल ठरू शकणार आहे. बुधादित्य राजयोग सूर्य आणि बुध यांच्या योगाने तुमच्या धनाच्या घरात तयार झालाय. त्याचसोबत बुधाचाही उदय झाला आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकणार आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा कालावधी तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा दर्शवतो. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. 


सिंह रास (Leo Zodiac)


सिंह राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने बुध ग्रहाचा उदय शुभ सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे. तसंच कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांच्या जीवनात गोडवा येणार आहे. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन योजना आखण्यासाठी उत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या लाइफ पार्टनरची साथ मिळेल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )