Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बुधादित्य राजयोग आणि विपरित राजयोग हे दोन्ही अतिशय शुभ मानले जातात. जुलै महिन्यापूर्वी बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. मुळात या राशीमध्ये सूर्य अगोदर असल्यानेबुधादित्य राजयोग आणि विपरित राजयोग एकत्र येत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना याचा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोन राजयोगांच्या निर्मितीमुळे 3 राशींना येत्या काळात भरपूर लाभ मिळणार आहे. यावेळी काही लोकांना भरपूर पैसा आणि तर काहींच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. जाणून घेऊया, या राशी कोणत्या आहेत.


मिथुन रास


मिथुन राशीच्या व्यक्तींना विपरीत राजयोगाचा फायदा होईल. यावेळी गुंतवणूक आणि निर्यात-आयात यांच्यामध्ये लोकांना यश मिळेल. व्यावसायिक प्रयत्नांमध्ये मान्यता मिळेल. विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करू शकतात. व्यवसायात वाढ होणार आहे. दुसरीकडे बुध ग्रहामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि निर्णय क्षमता वाढणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नवीन पार्टनर मिळू शकतो.


तूळ रास


तूळ राशीच्या लोकांना देखील विपरीत राजयोगाचा लाभ होणार आहे. या काळात व्यक्ती जुन्या आजारांवर मात करू शकतात. नोकरी तसंच व्यवसायात अचानक आर्थिक लाभ अपेक्षित आहे. पदोन्नतीच्या मिळण्याच्या संधी आहेत. धार्मिक व्यक्तींना हा काळ विशेषतः अनुकूल वाटू शकतो. प्रतिष्ठा आणि सन्मान वाढण्याची अपेक्षा करू शकतात. वैवाहिक जीवनातील समस्याही संपुष्टात येणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.


धनू रास


धनू राशीच्या लोकांना दोन्ही राजयोगाचा लाभ मिळणार आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींना न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळू शकतं. धैर्य आणि पुढाकार वाढणार असून सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. नवीन लोकांशी तुमचे संपर्क जोडले जाणार आहेत. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )