मुंबई : असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं की, त्यांना रस्त्याने चालताना, अचानक पैसे पडलेले दिसतात. काही लोक असे असतात की, काहीही विचार न करता हे पैसे उचलतात. तर काही लोक हे पैसे एखाद्या गरजू व्यक्तीला दान करतात. तर काही लोक असे पैसे न उचलणंच शहानपणाचे समजतात. या पडलेल्या पैशांमध्ये नाणी, नोटा काहीही असू शकतात, पण या पैशाचे करायचे काय, या संभ्रमात काही लोक राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु तुम्हाला माहितीय की रस्त्यावर असे पडलेले पैसे मिळणे हे अनेक गोष्टी सूचित करतात.


तर वास्तु सल्लागार रस्त्यावर पडलेले पैसे मिळण्याबाबत काय सांगतात? हे शुभ संकेत आहेत की अशुभ?


असे मानले जाते की, जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर पडलेले नाणे मिळाले, तर तो लवकरच काही नवीन काम सुरू करू शकतो आणि हे नवीन काम त्या व्यक्तीला यश आणि आर्थिक संकटांपासून मुक्ती देईल.


दुसर्‍या मान्यतेनुसार, रस्त्यावर पडलेले पैसे मिळणे म्हणजे माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात आणि जर तुम्ही कोणत्याही स्थानावर मालमत्तेत गुंतवणूक करत असाल, तर त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल.


असे मानले जाते की, ज्या लोकांना अचानक एखादी नोट रस्त्यावर पडलेली आढळते, अशा लोकांवर माता लक्ष्मीची कृपा राहते. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही समस्या येत नाहीत.


जर एखादी व्यक्ती काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असेल आणि त्या व्यक्तीला वाटेत पैसे पडलेले दिसले, तर हे सूचित करते की, तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.


ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणाहून घरी परतत असताना एखाद्या व्यक्तीला रस्त्यात पैसे पडलेले दिसले, तर ते तुम्हाला आगामी काळात आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे.


एखाद्या व्यक्तीला वाटेत अचानक पैशांनी भरलेली पर्स दिसली तर हे लक्षण आहे की, त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच कोणीतरी खूप चांगले घडणार आहे. असेही मानले जाते की पैशाने भरलेली बॅग किंवा पाकिट मिळणं म्हणजे तुम्हाला तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.