Coconut Importance in Puja: चैत्र नवरात्रोत्सवाचा (Chaitra Navratri) शुभारंभ झालेला असतानाच सध्या सर्वत्र या पवित्र पर्वामुळं सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सव किंवा घटस्थानपनेच्या या शुभ काळामध्ये कलशस्थापनेला अनन्यसाधारण महत्त्वं असून फक्त याच क्षणी नव्हे, तर अनेक विधींदरम्यान कलशस्थानपा केली जाते. थोडक्यात कोणत्याही धार्मिक विधीसाठी नारळाला ईष्ठ स्वरुप प्राप्त असतं. लक्ष्मी, गणपती किंवा विष्णूचं स्वरुप म्हणून हरे श्रीफळ पुजनीय असतं. कोणतीही पूजा या नारळाशिवाय पूर्णत्वास जात नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारळ पुजेसाठी मांडल्यानंतर देवतेचं स्वरुप त्यातच विराजमान असल्याची धारणा मनात ठेवत अनेकजण त्याची आराधना करतात. अनेकांच्या देवघरामध्ये कायमस्वरुपी घटावरही नारळ स्थापन केला जातो. अनेकदा या नारळाला सतत कलशातील पाणी मिळाल्यामुळं कोंब फुटतो. अनेकदा हा कोंब मोठा होऊन त्यातून चक्क नारळाचं रोप उगवण्यासही सुरुवात होते. 


नारळाला कोंब फुटणं शुभ की अशुभ? 


नवरात्रोत्सव असो किंवा इतर कोणता दिवस, नारळाला कोंब फुटणं अतिशय शुभसंकेत मानला जातो. कोणत्याही ठिकाणी कोणत्याही स्वरुपात एका नव्या जीवाची, आयुष्याची सुरुवात होणं हे सात्विक आणि सकारात्मक उर्जेचं प्रतीक आहे. अध्यात्मामध्येही नारळाला कोंब फुटण्याच्या क्रियेकडे कमालीची उर्जादायी आणि सकारात्मक क्रिया म्हणून पाहिलं जातं. ही प्रगतीची चिन्हंही समजली जातात. त्यामुळं नारळाला कोंब फुटणं हे शुभसूचक असल्याची अनेकांचीच धारणा आहे. 


हेसुद्धा वाचा : Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा थेट भाजपवर गंभीर आरोप 


 


काही संदर्भांनुसार नारळामध्ये लक्ष्मीचा वास असल्यामुळं नवरात्रोत्सवादरम्यान किंवा एखाद्या शुभप्रसंगी नारळाला कोंब फुटणं म्हणदे साक्षात लक्ष्मीचा वरदहस्त मानला जातो. ज्योतिषविद्येचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञ मंडळींच्या मते हे भावी काळात आर्थिक स्थिती सुधारण्याचे संकेत मानले जातात. 


पौराणिक कथा आणि धारणांनुसार नारळाचं रोप विष्णू आणि लक्ष्मीनं पृथ्वीवर आणलं होतं. सोबत होती, कामधेनू. नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्षही म्हटलं जात असल्यामुळं नारळात कोंब येण्याचा संबंध साक्षात विष्णूच्या आशीर्वादाशी जोडला जातो. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे मिळाली असून, झी 24 तत्सम समजुतींसंदर्भातील कोणत्याही गोष्टीची खातरजमा करत नाही. )