Chanakya Niti: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? वाचा काय सांगते `चाणक्य नीती`
Chanakya Niti, Extramarital Affair: विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं समोर आली आहेत.
Chanakya Niti : स्त्रियांकडे पुरुषांचे आकर्षित होणं सामान्य आहे. पण नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार कुमारी मुलींपेक्षा पुरुषांना विवाहित स्त्रियांमध्ये जास्त रस आहे. हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, परंतु हे अगदी खरं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विवाहबाह्य संबंध चुकीचे मानलं जातं. त्यामुळे अनेकांचे संसार देखील उद्धवस्त झाले आहेत. चाणक्य नीतीमध्ये अनेक तत्त्वांवर भाष्य करण्यात आलंय. ज्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, कुटुंब, नातेसंबंध, प्रतिष्ठा, समाज, संबंध, देश या गोष्टींचा समावेश आहे. अशातच विवाहित पुरूष लग्नानंतरही स्त्रियांकडे का आकर्षित होतात? याची काही कारणं समोर आली आहेत.
वाचा काय सांगते चाणक्य नीती -
शारिरीक असमाधान - पती-पत्नीच्या नात्यात शारीरिक संबंध महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे दोघांच्या नात्यात कमतरता दिसून येते. संबंध दुरावतात आणि नंतर नातं तुटण्याची देखील शक्यता असते.
लग्नासाठी तयार नसणं - अनेक जणांची फार कमी वयात लग्न होतात. त्यामुळे अंगावर जबाबदारी येते. तरुणवयात व्यक्ती आपल्या करिअरबाबत जास्त गंभीर असते. कमी वयात समजही कमी असते. त्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेतले जातात.
अॅट्रॉक्शन कमी होणं - अनेकदा लग्नानंतर जोडीदाराप्रती असलेलं आकर्षण कमी होताना दिसतं. त्याला वेगवेगळी कारणं असतात. वजन वाढणं किंवा शारिरीक व्याधींमुळे आकर्षण कमी होत जातं. त्याचा परिणाम बाह्य संबंधांवर होतो.
जोडीदारावर विश्वास ठेवा - कोणतंही नातं असो विश्वास गरजेचा असतो. अनेकदा विश्वासावर साध्य ठरणारी माणसं नातं जपण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे जोडीदारावर विश्वास ठेवा.
मुलांच्या जन्मानंतर होणारे बदल - ज्यावेळी दोघेच असता त्यावेळी नातं चांगलं राहतं. मात्र, मुलांच्या जन्मानंतर नात्यात दुरावा निर्माण होते, त्यावेळी काळजी घेणं गरजेचं असतं.