Chandra Grahan 2022 : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 08 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतीयांना देखील पाहता येणार आहे. अनेक दशकांनंतर या चंद्रगहणाच्या दिवशी एक योग जुळून येत आहे. चंद्रग्रहणानंतर एकाच महिन्यात 5 प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलणार आहेत. या महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र हे प्रमुख ग्रह आपल्या राशी बदलणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कुठे दिसणार चंद्रग्रहण


वर्षातील पहिले चंद्रग्रहण 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झाले होते. आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण 8 नोव्हेंबरला होणार आहे. आगामी चंद्रग्रहण भारताच्या पूर्वेकडील भागात दिसणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे चंद्रग्रहण देशाची राजधानी दिल्लीसह गुवाहाटी, रांची, पाटणा, सिलीगुडी आणि कोलकाता येथेही दिसणार आहे. या शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना चंद्रग्रहणाच्या काळात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.


चंद्रग्रहणानंतर मंगळ आणि बुध या ग्रहांचे अधिपती राशी बदलणार आहेत. या दिवशी बुध तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. या व्यतिरिक्त या दिवशी मंगळ वृषभ राशीमध्ये प्रतिगामी स्थितीत प्रवेश करेल.


16 नोव्हेंबर रोजी सूर्य दुर्बल राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. चंद्रग्रहणानंतर सूर्याचे हे संक्रमण बहुतेक लोकांना शुभ फळ देईल. अशा लोकांना मान-सन्मान, प्रतिष्ठा, आरोग्य आणि धन लाभ मिळू शकतो.


चंद्रग्रहण आणि ग्रह संक्रमण या संयोगामुळे काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागेल. ज्योतिषांच्या मते, चंद्रग्रहणानंतरही काही राशींना जवळजवळ संपूर्ण महिना काळजी घ्यावी लागेल. विशेषत: मिथुन, वृश्चिक आणि कुंभ वगळता इतर सर्व राशींना पुढील एक महिना काळजी घ्यावी लागेल.


भारतात चंद्रग्रहण किती वाजता


जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. भारतीय वेळेनुसार, वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण 08 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:20 वाजता सुरू होईल आणि 06.20 पर्यंत चालेल.