मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण सोमवारी म्हणजेच आज आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होतंय. 80 वर्षांनंतर ग्रह आणि नक्षत्रांचा असा मेळ तयार होत असल्याचं म्हणणं आहे. संपूर्ण चंद्रग्रहण जगभरातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. दरम्यान शास्त्रज्ञ याला 'ब्लड मून' असंही संबोधत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते आणि पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला झाकते तेव्हा असं होतं. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण केव्हा, कुठे आणि कसे दिसेल आणि ब्लड मून म्हणजे काय ते जाणून घेऊया.


कधी दिसणार पहिलं चंद्रग्रहण?


भारतीय वेळेनुसार, वर्षातील पहिलं चंद्रग्रहण आज सकाळी 7 वाजून 2 मिनिटांनी सुरु झालं असून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत दिसणार आहे. या चंद्रग्रहणाचा कालावधी 5 तासांपर्यंत असणार आहे.


कुठे दिसणार चंद्रग्रहण?


हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे भारताता सूतक काळ पाळला जाणार नाही अशीही माहिती मिळाली आहे. अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, उत्तर-दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका, पश्चिम युरोप, मध्य-पूर्व या ठिकाणी चंद्रग्रहण दिसणार आहे. 


जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या काठावरुन चंद्रावर पोहोचतो तेव्हा त्याचे निळे आणि हिरवे रंग वातावरणात विखुरले जातात. कारण त्यांची वेवलेंथ कमी असते. तर लाल रंगाची वेवलेंथ जास्त असते आणि ती चंद्रापर्यंत पोहोचू शकते. अशा स्थितीत चंद्र लाल दिसू लागतो. म्हणून याला ब्लड मून म्हणतात.