Grahan Yog Effects : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीत जेव्हा जेव्हा बदल होतो तेव्हा आपल्या कुंडलीत शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. सध्या कुंडलीत अतिशय घातक आणि धोकादायक अशुभ योग तयार झाला आहे. चंद्राने आपली स्थिती बदली आहे. त्यामुळे तूळ राशीत चंद्र आणि केतुची युती झाली आहे. चंद्र आणि केतुच्या संयोगामुळे ग्रहण योग तयार झाला आहे. हा योग गुरुवारी 27 जुलैला संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे या धोकादायक योगामुळे तीन राशींच्या लोकांना उद्या संध्याकाळपर्यंत सतर्क राहवं लागणार आहे. 27 जुलैला संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनंतर चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. (Chandra Ketu Yuti making in libra Grahan yog three zodiac signs be careful till 27 july astro remedies)


'या' राशींना राहवं सतर्क 


तूळ (Libra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूळ राशीतच चंद्र आणि केतु यांची युती झाल्यामुळे या राशीच्या लोकांना सर्वाधिक धोका आहे. या लोकांची मानसिक स्थिती गडबडणार आहे. या काळात अतिविचार, तणाव आणि आर्थिक हानीचा सामना या लोकांना करावा लागणार आहे. आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं आत्मविश्वास ढासळणार आहे. 


मेष (Aries)


 या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात खळबळ माजणार आहे. या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. चोहूबाजूने तुम्हाला अडचणी घेरणार आहेत. 


वृषभ (Taurus)


या राशीच्या लोकांना ग्रहण योगामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे. तुमचं मानसिक संतुलन गडबडणार आहेत. तुम्हाला या काळात एकटेपणा जाणवणार आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत तुमचे संबंध या काळात बिघडण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा वादविवाद होणार आहे. 


ग्रहण योग टाळण्याचे उपाय


ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहण योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. आज आणि उद्या मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करा. बुधवार म्हणजे आज गणरायची पूजा करा. असं म्हणतात गणरायाची पूजा केल्यास केतू ग्रहामुळे निर्माण झालेले दोष दूर होतात. आज गायीची सेवा करून गरीबांना मदत आणि दान करा. 


हेसुद्धा वाचा - Dhan Yoga : आजचा दिवस 4 राशींच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही, धनयोगात पैशांची होणार बरसात


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)